ETV Bharat / bharat

Honey Trap Threat : हनी ट्रॅपमध्ये अडकली भारताची सुरक्षा; फक्त सेक्स चॅटसाठी ISI ला दिली लष्कराची गोपनीय माहिती

भारतीय जवान आणि लष्कर अधिकाऱ्यांना अडकविण्यासाठी आयएसआयने एक टीम तयार केली आहे. त्यात सुंदर महिलांना भरती केल्याची माहिती रॉनेही दिली होती.

Honey Trap Threat
Honey Trap Threat
author img

By

Published : May 5, 2023, 7:48 PM IST

हैदराबाद : हनी ट्रॅपच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. सामन्य नागरीक ते संरक्षण क्षेत्रात काम करणारे अधिकारी, कर्मचारी हनी ट्रॅपचे शिकार होत आहेत. बहुतेक वेळेस हनी ट्रॅप आंतरराष्ट्रीय स्तरावरुनही होत असते. शत्रू राष्ट्र हनी ट्रॅपच्या मदतीने सुरक्षेची माहिती मिळवत असतात. पाकिस्तानही भारताविरोधात लढाई करण्यासाठी हनी ट्रॅपचा उपयोग करत असतो. आयएसआय अनेक सैन्य अधिकारी आणि जवानांना हनी ट्रॅपमध्ये अडकवत आहे.

हनी ट्रॅपमध्ये डीआरडीओचे दोन अधिकारी अडकले : पुण्यातील डीआरडीओ या संस्थेतील अधिकारी देखील यात अडकले आहेत. गेल्या दोन वर्षात डीआरडीओमधील दोन अधिकाऱ्यांना अशा प्रकरणात अटक झाली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांनी डीआरडीओमधील काही संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या आयएसआयला दिल्याचे सांगण्यात येत आहे. पुण्यातील डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांना एटीएसने आज या प्रकरणात अटक केली आहे.

न्यूड फोटोनंतर ब्लॅकमेल : कुरुलकर यांच्याशी सोशल मीडियावर संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादित करत त्यांना न्यूड फोटो आणि व्हिडिओ कॉल करण्यास प्रवृत्त करण्यात आलं. कुरुलकर यांनीही न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यात येऊ लागलं. बदनामी होईल या धाकाने कुरुलकर यांनी देशाची गोपनिय माहिती आयएसआयला दिली आहे.

डीआरडीओचे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी बाबुराम दे : डीआरडीओचे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी बाबुराम दे हे ओडिसातील चांदीपूर येथे कार्यरत होते. 51 वर्षीय तांत्रिक अधिकारी बाबुराम दे हेही हनी ट्रॅपमध्ये अडकले होते. त्यांनी पाकिस्तानच्या गुप्तहेरांना डीआरडीओमधील संवेदनशील माहिती दिली होती. व्हाट्सअॅपद्वारे फोटो आणि व्हिडिओ काढून मिसाईल लॉन्चिंगची माहिती त्यांनी पाकिस्तानला दिली होती.

सेक्स चॅटमुळे अडकतात जाळ्यात : हनी ट्रॅपमध्ये लष्करातील जवान देखील अडकवली आहेत. त्यांना त्यात अडकवल्यानंतर त्यांच्याकडून भारताच्या सुरक्षेची माहिती मिळवली जात आहे. दरवर्षी एक अधिकारी पाकच्या हनी ट्रॅपमध्ये अडकत आहे. यामुळे लष्करात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आणि जवानांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांशी जवळकीता साधून त्यांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवले जात आहे.

98 अधिकाऱ्याचा संगणक हॅक : पाकिस्तानच्या गुप्तहेरांनी सेजल कपूर या बनावट नावाच्या आधारे फेसबुकवर 98 लष्कर अधिकाऱ्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांचे कॉम्प्युटर हॅक केले होते. यात भूदल, नौदल, वायूदल याचबरोबर पॅरामिलिट्रीचे अधिकारी होते. अनेकवेळा सेक्स चॅटच्या मोहापायी अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकत असतात. एक हवाई दलाच्या जवानाने फक्त सेक्स चॅट करण्यासाठी आयएसआयच्या एजंटला आयएएफच्या युद्धाची माहिती दिली होती. किरण रंधवा असे या आयएसआयच्या एजंटचे नाव होते.

हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची उदाहरणे :भारतीय जवान आणि लष्कर अधिकाऱ्यांना अडकविण्यासाठी आयएसआयने एक टीम तयार केली आहे. त्यात सुंदर महिलांना भरती केल्याची माहिती रॉनेही दिली होती.

हवाई दलाचा ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह: कॅप्टन अरुण मारवाह याने भारतीय हवाई दलाची गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेला दिली होती. ही घटना आहे चार वर्षापूर्वीची फोनवर फक्त सेक्स चॅट करण्यासाठी त्याने ही माहिती दिली होती. हवाई दलाच्या मुख्यालयातील महत्वाच्या कागदपत्रांचे फोटो मोबाईलवर काढून व्हॉट्सअॅपवर आयएसआयला पाठवत होता.

वायूसेनेचे एअरमॅन रंजीत केके: 2015 साली यांनी रंजीत केके यांनी पाकिस्तानच्या महिला गुप्तहेराला हनी ट्रॅपच्या माध्यमातून वायुसेनेची संवेदनशील माहिती दिली होती. कोलंबो येथील पाकिस्तानी दुतावासात तैनात असलेल्या कर्नलच्या इशाऱ्यावरुन हे करण्यात आले होते.

चतुर्थ श्रेणीमधील कर्मचारी : लष्करी मुख्य अभियंता झोन कार्यालयातील काम करणारे चतुर्थ श्रेणीमधील कर्मचारी राम सिंह हे देखील हनी ट्रॅपमध्ये अडकले होते. त्यांनी राजस्थानच्या इंटेलिजेंस विंगची गोपनिय माहिती आयएसआयला दिली होती. राम सिंह यांच्याकडे एमईएस लष्कर क्षेत्र आणि इतर काही मह्त्वपूर्ण कामांची जबाबदारी होती. लष्करासाठी प्रस्तावित असलेल्या योजनांची गोपनीय माहिती त्यांनी पाकिस्तानला दिली होती.

शांतीमय राणा लष्कर जवान: शांतीमय राणा याने पाकिस्तानी अभिनेत्रीला गोपनिय माहिती दिली होती. भारतीय लष्करासंबंधित माहिती पाकिस्तानी अभिनेत्रीला पाठवल्याच्या आरोपाखाली शांतीमय राणा याला राजस्थान पोलिसांच्या इंटेलिंजेंस टीमने अटक केली होती.

इमामी खान : आग्रामधील सिंकदरा येथे राहणारा इमामी खान हाही हनी ट्रॅपमध्ये अडकला होता. आग्रा येथील रुडकी येथील लष्कर छावणीमध्ये तो सहाय्यक लेखाधिकारी होता. इमामी खान याने भारतीय लष्कराशी संबंधित काही महत्त्वाची माहिती पाकिस्तानच्या मुलीला दिली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे दोघेही एकमेंकांच्या संपर्कात आले होते.

हेही वाचा : Honey Trap : हनी ट्रॅप म्हणजे काय रे भावा? आयएसआयकडून कसा होतो हनी ट्रॅपचा वापर ?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.