ETV Bharat / bharat

डॉक्टरांची 'टर' उडवणारा रामदेव बाबांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

योगगुरू बाबा रामदेव सध्या आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर डॉक्टरांकडून कारवाईची मागणी केली जात आहे. आयएमएनेही बाबांच्या अटकेची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. तर दुसरीकडे रामदेव बाबांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

रामदेव बाबा
रामदेव बाबा
author img

By

Published : May 24, 2021, 7:39 PM IST

नवी दिल्ली - नुकतेचं स्वामी रामदेव यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतीसंदर्भात अवमानजक भाष्य केले. हा संपूर्ण विषय वादग्रस्त ठरला आणि देशभरातील डॉक्टरांनी बाबांविरोधात मोर्चा उघडला. देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनाही कठोर शब्दांत बाबा रामदेव यांना पत्र लिहावे लागले. त्यानंतर रामदेब बाबा यांनी आपले वक्तव्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली. आता हे प्रकरण शांत होते न होतेच तर रामदेव बाबांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये डॉक्टारांची टर उडवल्याचे पाहायला मिळतयं.

योगगुरू बाबा रामदेव यांचे डॉक्टराबाबत वादग्रस्त वक्तव्य

योगगुरू स्वामी रामदेव आपल्या भक्तांना दररोज सकाळी 4:30 ते 7 या वेळेत पतंजली योगपीठ व इतरत्र योग शिकवतात. यावेळी ते आपल्या भक्तांना देशभक्ती, राजकारण आणि आयुर्वेदाबद्दल बोलत राहतात. त्यांचा असात योग शिकवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हिडिओत रामदेव बाबा म्हणतात, की टर टर करत असतात. टर बनायचे आहे टर, डॉक्टर. लसीचा डबल डोस घेतल्यानंतरही 1000 पेक्षा जास्त डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. जो स्वत:ला नाही वाचवु शकला, तो कसला डॉक्टर. तर मी म्हणतो, डॉक्टर बनायचे आहे. तर स्वामी रामदेव बाबाप्रमाणे बना. ज्याच्याकडे कोणतीही पदवी नाही. विदआउट एनी डिग्री विथ डिग्निटी आय एम ए डॉक्टर. या व्हिडिओची नेमकी वेळ आणि तारीख अद्याप माहित नाही. परंतु रामदेव डॉक्टरांना टोमणे मारताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

अखिल भारतीय युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास यांनी हा व्हिडिओ टि्वट केला आहे. त्यांनी रामदेव बाबांच्या अटकेची मागणी आपल्या टि्वटमधून केले आहे. डॉ.रागिनी नायक यांनीही रामदेव बाबाला रामदेवला केंद्रस्थानी ठेवून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

रामदेव बाबा यांचे वादग्रस्त विधान -

रामदेव बाबा यांनी अ‌ॅलोपॅथी उपचार पद्धतीला मूर्खपणा असे म्हटले होते. अ‌ॅलोपॅथीच्या अपयशाबद्दलही त्यांनी भाष्य केले होते. ही उपचारपद्धती म्हणजे मूर्खपणा आणि वैज्ञानिक दिवाळखोरी आहे. कोरोनावर उपचारामध्ये हायड्रोक्लोरिक्विन फेल झालं. नंतर प्लाझ्मा थेरपी, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, फॅबिफ्लू फेल ठरलं. लाखो लोकांचा मृत्यू अ‌ॅलोपॅथीचा उपचार घेतल्यामुळे झाला आहे. जेवढ्या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्यानं आणि रुग्णालयात न गेल्यामुळे झाला. त्यापेक्षा जास्त रुग्ण अ‌ॅलोपॅथी उपचार मिळाल्यानंतरही मृत्युमुखी पडले. त्यामुळे आता अनेक मुत्यूचे कारण अ‌ॅलोपॅथिक उपचार पद्धती आहे, असे ते म्हणाले होते. यावर वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी आपले वक्तव्य मागे घेतले. या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.