नवी दिल्ली: कच्छमधील जाखोच्या सागरी सीमेवर (kutch maritime border) पाकिस्तानी सागरी सुरक्षा दलाने भारतीय मच्छिमारांच्या नौकेवर गोळीबार केला आहे. (fishermen boat fired by Pakistan). गोळीबारामुळे भारतीय बोट समुद्रात बुडाली, मात्र तटरक्षक दलाच्या पथकांनी बोटीत असलेल्या 8 मच्छिमारांची सुटका केली आहे. (Indian Fishermen Rescued).
अरबी समुद्रात करत होते मासेमारी: कच्छच्या जाखो प्रदेशाच्या समुद्रात अब्दासा तालुक्यातील मंगरोळ आणि जी.जे. 1 1-MM-3873 हरसिद्धी 5 नावाची मासेमारी बोट जाखौ आणि ओखाच्या दिशेने अरबी समुद्रात मासेमारी करत होती. पाकिस्तानी सागरी सुरक्षेने जाखोवजवळ बोटीवर गोळीबार केल्याने या मच्छिमारांच्या बोटी बुडाल्या. सागरी पोलिसांनी याप्रकरणी पुढील कारवाई सुरू केली आहे. तसेच जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुरू आहे मासेमारीचा हंगाम: मासेमारीचा हंगाम नुकताच सुरू झाला आहे. यामुळे सागरी सुरक्षा दलाने गस्त वाढवली आहे. गस्त घालणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाच्या पथकाने तात्काळ कारवाई करत बोटीवरील खलाशांची सुटका केली. ओखा कोस्टगार्डने मच्छिमारांना जाखो पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले असून पुढील तपास सुरू आहे.