ETV Bharat / bharat

Indian Couple With 45 Pistols Arrested : व्हिएतनामवरुन आलेल्या जोडप्याला सीमाशुल्क विभागाने घेतले ताब्यात; ४५ पिस्तुले केली जप्त

author img

By

Published : Jul 13, 2022, 10:24 PM IST

बुधवारी दिल्ली विमानतळावर एका जोडप्याला अटक करण्यात ( Delhi Airport Indian Couple Arrested ) आली असून, त्यांच्याकडून ४५ पिस्तुले जप्त करण्यात आली ( Indian Couple With 45 Pistols Arrested ) आहेत. यापूर्वीही तुर्कीतून 25 पिस्तुले भारतात आणल्याची कबुली या जोडप्याने दिली आहे.

Indian Couple With 45 Pistols Arrested
४५ पिस्तुले जप्त

नई दिल्ली : दिल्ली विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका जोडप्याला अटक करण्यात आली ( Delhi Airport Indian Couple Arrested ) आहे. त्याच्यावर शस्त्रास्त्र तस्करीचा आरोप आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. या दाम्पत्याकडून 45 पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेली शस्त्रे खरी आहेत की नाही याची ‘बॅलिस्टिक रिपोर्ट’ पुष्टी करेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

  • Delhi | An Indian couple that arrived from Vietnam was nabbed & 45 guns worth over Rs 22 lakh from two trolley bags seized. They admitted their previous indulgence in smuggling 25 pieces of guns having a value of over Rs 12 lakh: Commissioner of Customs, IGI Airport & General pic.twitter.com/TvjNbJt5yA

    — ANI (@ANI) July 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दिल्ली विमानतळावर 45 पिस्तूल जप्त - अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, 'प्राथमिक अहवालात नॅशनल सिक्युरिटी गार्डने (एनएसजी) शस्त्रे पूर्णपणे कार्यरत असल्याची पुष्टी केली आहे.' व्हिएतनामच्या हो ची मिन्ह शहरातून सोमवारी येथे आलेल्या आरोपींवर अधिकारी नजर ठेवून होते. या जोडप्यासोबत त्यांची नवजात मुलगीही होती. "पुरुष प्रवाशाच्या सामानाच्या तपासणीदरम्यान, 45 पिस्तूल सापडले, ज्याची किंमत अंदाजे 22.5 लाख रुपये आहे," सीमाशुल्क विभागाने एका निवेदनात म्हटले आहे.

Indian Couple With 45 Pistols Arrested
४५ पिस्तुले केली जप्त

पिस्तुलाची किंमत सुमारे 22 लाख 50 हजार रुपये - "प्राथमिक अहवालात, नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) ने पुष्टी केली आहे की तोफा पूर्णपणे कार्यरत आहेत," कस्टम अधिकाऱ्याने सांगितले. जगजीत सिंग आणि जसविंदर कौर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून ते पती-पत्नी आहेत. दोघेही १० जुलै रोजी व्हिएतनामहून भारतात परतले होते. जगजीत सिंग याने दोन ट्रॉली बॅगमध्ये पिस्तूल आणले होते, जे त्याला त्याचा भाऊ मनजीत सिंग याने दिले होते. त्यांना बॅग देण्यासाठी मनजीत पॅरिसहून व्हिएतनामला आला होता. या पिस्तुलाची किंमत सुमारे 22 लाख 50 हजार रुपये आहे. दोन्ही आरोपींनी यापूर्वीही तुर्कीतून 25 पिस्तुले आणल्याची कबुली दिली आहे.

Indian Couple With 45 Pistols Arrested
४५ पिस्तुले केली जप्त

हेही वाचा - Udaipur Murder Case : कन्हैयालाल हत्या प्रकरणात एनआयएचे अनेक धक्कादायक खुलासे; नुपूर शर्मा समर्थकांचे शिरच्छेद करण्याचे दिले होते लक्ष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.