ETV Bharat / bharat

Indian Climber Missing: दरड कोसळल्याने अन्नपूर्णा पर्वतावरून भारतीय गिर्यारोहक बेपत्ता, शोध मोहीम सुरू

राजस्थानमधील किशनगड येथील गिर्यारोहक अनुराग मालू हे नेपाळमधील अन्नपूर्णा पर्वत उतरताना बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे.

Indian climber missing
गिर्यारोहक अनुराग मालू
author img

By

Published : Apr 18, 2023, 10:30 AM IST

Updated : Apr 18, 2023, 12:50 PM IST

काठमांडू : नेपाळमधील दहाव्या क्रमांकाच्या अन्नपूर्णा पर्वतावर उतरत असताना सोमवारी दुपारी एक भारतीय गिर्यारोहक बेपत्ता झाला. बेपत्ता गिर्यारोहक राजस्थानमधील किशनगड येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे नाव अनुराग मालू (वय 34) आहे. सोमवारी दुपारी तिसऱ्या कॅम्पवरून परतत असताना मालूला दरड कोसळल्याची माहिती मिळाली आहे. बेपत्ता गिर्यारोहकाचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे.

गिर्यारोहकाचा शोध सुरू : सेव्हन समिट ट्रेक्सचे अध्यक्ष मिंग्मा शेर्पा यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, बेपत्ता गिर्यारोहकाचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन सुरू आहे. त्यांनी सांगितले की गिर्यारोहक अनुराग मालू सोमवारी दुपारी कॅम्पवरून परतत असताना अचानक दरड कोसळली. मोहीम संघटनेचे अधिकारी शेर्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या छावणीतून उतरत असताना मालू सुमारे 6,000 मीटरवरून खाली पडून बेपत्ता झाला. तेव्हापासून गिर्यारोहकाचा शोध सुरू आहे.

शिखर चढण्याचा प्रयत्न : असे सांगितले जात आहे की, गिर्यारोहक मालू अनुरागने शिखर चढण्याचा प्रयत्न सोडला होता. तो कॅम्पवर परतत असताना दुपारी दरड कोसळली. त्याच्या प्रकृतीबाबत अद्याप काहीही माहिती नाही. राजस्थानमधील गिर्यारोहक अनुराग मालूने गेल्या वर्षी माऊंट अमा दाबलाम जिंकले होते. मालू या मोसमात एव्हरेस्ट, अन्नपूर्णा आणि ल्होत्से चढाई करण्याचा विचार करत होता. राजस्थानच्या 34 वर्षीय अनुराग मालूला कर्मवीर चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. मिंग्मा शेर्पा यांनी सांगितले की, बेपत्ता गिर्यारोहक मालूचा शोध सुरू आहे. मात्र अद्याप त्याच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. भारतीय माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, त्याने पर्वत चढण्यासाठी प्रसिद्ध गिर्यारोहक बचेंद्री पाल यांचे मार्गदर्शनही घेतले होते. गिर्यारोहणासाठी लडाखमधील प्रसिद्ध चादर ट्रेकसाठी 2020 मध्ये गिर्यारोहक गेले होते. मात्र अचानक नदीला पूर आल्यामुळे ते गिर्यारोहक अडकले होते. या घटनेबद्दल भारतीय वायू सेनेला माहिती मिळताच तत्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले होते.

हेही वाचा : Mountaineer Savita Kanswal : एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर मकालू पर्वतावर यशस्वी चढाई, वाचा गिर्यारोहक सविता कंसवाल यांची स्टोरी

Last Updated : Apr 18, 2023, 12:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.