ETV Bharat / bharat

भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर पठाणकोटमध्ये कोसळले - Pathankot Punjab

भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर पंजाबच्या पठाणकोटमध्ये कोसळल्याची घटना मंगळवारी समोर आली. हे हेलिकॉप्टर जिल्ह्यातील रणजित सागर धरणाजवळ कोसळले. सध्या घटनास्थळावर बचावकार्य राबविले जात आहे.

भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर पठाणकोटमध्ये कोसळले

author img

By

Published : Aug 3, 2021, 2:45 PM IST

पठाणकोट: भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर पंजाबच्या पठाणकोटमध्ये कोसळल्याची घटना मंगळवारी समोर आली. हे हेलिकॉप्टर जिल्ह्यातील रणजित सागर धरणाजवळ कोसळले. सध्या घटनास्थळावर बचावकार्य राबविले जात आहे.

पोलिसांनी दिली माहिती

तलावात हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती आम्हाला मिळाली आणि आम्हि तत्काळ घटनास्थळी धाव घेतल्याचे पठाणकोटचे वरीष्ठ पोलीस अधीक्षक सुरेंद्र लांबा यांनी सांगितले. सध्या इथे बचावकार्य राबविले जात आहे. अजून कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नसल्याचेही ते म्हणाले. रणजित सागर धरण हे पठाणकोटपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे.

एनडीआरएफकडून बचावकार्य

हे हेलिकॉप्टर लष्कराच्या 254 एव्हीएन स्क्वाड्रनचे होते. मामुन कॅन्टोन्मेन्टमधून त्याने उड्डाण केले होते. जेव्हा ते कोसळले तेव्हा ते कमी उंचीवरून उड्डाण करत असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या घटनास्थळावर एनडीआरएफ पथकाकडून बचावकार्य राबविले जात आहे.

हेही वाचा - पाकव्याप्त काश्मीरसह जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य - टी. एस. त्रिमुर्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.