ETV Bharat / bharat

Booster Dose From Today : आजपासून बूस्टर डोस देण्यास सुरुवात; वाचा काय आहे नियमावली - देशभरात सध्या लसीकरण

आजपासून (दि. 10 डिसेंबर) आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्यास सुरुवात होत आहे. (Booster Dose From Today In India) देशभरात सध्या लसीकरण वेगाने सुरु आहे. (Booster Dose From Today) सर्वांना लसीचे दोन डोस दिले जात आहेत. (Booster Doses For Frontline Workers)तसेच, अनेक देशात बूस्टर डोसही देण्यात येत आहेत. आता भारतातही बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

आजपासून बूस्टर डोस देण्यास सुरुवात
आजपासून बूस्टर डोस देण्यास सुरुवात
author img

By

Published : Jan 10, 2022, 9:06 AM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी लसीकरण आणि बूस्टर डोस (Booster Dose) संबंधी महत्त्वाची घोषणा केली होती. त्यानुसार देशात 18 वर्षांखालील मुलांच्या लसीकरणाला (Vaccination) सुरुवात झाली आहे. तसेच, आजपासून (दि. 10 डिसेंबर) (Booster Doses For Frontline Workers, Seniors Begin Today) आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्यासही सुरुवात होत आहे. देशभरात सध्या लसीकरण वेगाने सुरु आहे. सर्वांना लसीचे दोन डोस दिले जात आहेत. तसेच, अनेक देशात बूस्टर डोसही देण्यात येत आहेत. (Precautionary Third Doses Of Vaccines) आता भारतातही बूस्टर डोस देण्यात येणार आहे. आज (दि. 10 जानेवारी)पासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर तसेच 60 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

काय आहे नियमावली?

  • येत्या 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, कोव्हिडमध्ये आघाडीवर काम करणारे कर्मचारी आणि 60 वर्ष व त्यावरील नागरिकांना लसीचे डोस देण्यात येणार आहेत.
  • वरील सर्वजण दुसऱ्या डोसच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले असल्यास तिसऱ्या डोससाठी पात्र ठरतील.
  • ऑनलाईन आणि नोंदणी पद्धतीने सुविधा उपलब्ध होणार
  • 60 वर्ष व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या व्यक्तींना तिसरा डोस देताना लसीकरण केंद्रावर कोणतेही प्रमाणपत्र जमा किंवा दाखवायची आवश्यकता नाही. फक्त अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरणाबाबत निर्णय घ्यावा लागले.
  • सर्व नागरिकांना शासकीय केंद्रावर लसीकरण विनामूल्य होणार आहे.
  • जर वरील कोणत्याही नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रावर लस घ्यायची असल्यास केंद्र सरकारने घोषित केलेल्या किंमतीत लस घ्यावी लागेल.

आरोग्य कर्मचारी आणि कोव्हिड योद्धे ज्यांचे वय 60 पेक्षा कमी आहे आणि ज्यांची कोविन ॲपवर नागरिक अशी वर्गवारी झाली आहे. अशा लाभार्थ्यांना लसीकरण फक्त शासकीय लसीकरण केंद्रात ऑनसाइट पद्धतीने उपलब्ध असेल त्यासाठी त्यांनी नोकरीच्या ठिकाणाचे प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र सादर करणे बंधनकारक असेल.

कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे दोन डोस घेतले असतील. तीच लस बूस्टर डोससाठी घेता येणार आहे. याचा अर्थ कोव्हॅक्सिन लशीचे पहिले दोन डोस घेतले असतील त्यांना बूस्टर डोसही कोव्हॅक्सिनचाच देण्यात येईल. तसेच कोव्हिशिल्डचे दोन डोस घेतले असतील, त्यांना बूस्टर डोस कोव्हिशिल्ड लशीचाच देण्यात येईल. अस नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केले होते.

हेही वाचा - ...म्हणून या 5 राज्यात लस प्रमाणपत्रावरून मोदींचा फोटो हटवला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.