ETV Bharat / bharat

भारत 2025 पर्यंत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था, तर 2030 ला तीसऱ्या क्रमांकावर

भारत 2025 पर्यंत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल. तर ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकत 2030 पर्यंत तीसऱ्या क्रमांकावर पोहचेल. 2019 मध्ये भारत 5 व्या स्थानावर होता. मात्र, त्यांची 2020 च्या सुरवातीला भारत 6 व्या क्रमांकावर पोहचला होता. तसेच 2018 मध्ये भारत सातव्या क्रमांकावर होता.

भारत 2025 पर्यंत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था, तर 2030 ला तीसऱ्या क्रमांकावर
भारत 2025 पर्यंत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था, तर 2030 ला तीसऱ्या क्रमांकावर
author img

By

Published : Dec 26, 2020, 3:08 PM IST

नवी दिल्ली - कोरोना साथीच्या रोगानंतर अमेरिकेला सर्वांत मोठा धक्का बसणार आहे. साथीच्या रोगाचा सर्वात मोठा परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. त्यामुळे 2028 पर्यंत अमेरिकेला मागे सारून चीन जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल. 'द सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च'ने (सीईबीआर) यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार जागतिक आर्थिक धोरणे आणि सॉफ्ट पॉवर यांच्याविषयी अमेरिका आणि चीनमधील संघर्ष येत्या काही वर्षांत तीव्र होईल.

कोरोना महामारी आणि त्यानंतरची आर्थिक घसरण चीनला आर्थिक महासत्ता बनण्यासाठी सुलभ करेल. सीईबीआरच्या म्हणण्यानुसार, चीनने सुरुवातीच्या काळात लॉकडाऊन करून साथीविरूद्ध तीव्र आणि कार्यक्षम रणनीती अवलंबून अर्थव्यवस्थेची गती कायम ठेवली. तर कोरोनाचा अमेरिकेला सर्वाधिक फटका बसला आणि अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळेच चीनची इतर देशांपेक्षा आर्थिक वाढ चांगली राहिली.

आतापर्यंतच्या अंदाजानुसार, 2021-25 पर्यंत चीन 5.7 टक्क्यांच्या वाढीसाठी तयार असल्याचे दिसत असून जे सकारात्मक आहे. 2026 ते 2030 पर्यंत चीनची आर्थिक वाढ साडेचार टक्क्यांपर्यंत राहील अशी अपेक्षा आहे. सध्याची आर्थिक महासत्ता असलेली अमेरिकेला चीनकडून कठोर स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. कोरोना महामारीमुळे अमेरिकेला सर्वात मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेत 2021 नंतर परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. परंतु तरीही ती चीनपेक्षा कमी गतीने होईल. अहवालानुसार, 2022 ते 2024 दरम्यान अमेरिकेची वाढ 1.9 टक्के होईल, तर त्यानंतर ती 1.6 टक्के राहिल.

भारत 2030 पर्यंत जगातील तीसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था -

यामुळे, चीन 2028 पर्यंत अमेरिकेला मागे टाकेल आणि जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल. महामारी होण्यापूर्वी असा अंदाज वर्तविला जात होता की, चीन हे लक्ष्य 2033 मध्ये प्राप्त करू शकेल. भारताच्या प्रगतीवरून दिसून येते की, भारत 2030 पर्यंत जगातील तीसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होईल. तर 2025 मध्ये युकेला, 2027 मध्ये जर्मनीला आणि जपानला 2030 पर्यंत मागे टाकेल. 2019 मध्ये भारत 5 व्या स्थानावर होता. मात्र, 2020 मध्ये भारत 6 व्या क्रमांकावर पोहचला होता. तसेच 2018 मध्ये भारत सातव्या क्रमांकावर होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.