नवी दिल्ली : भारताने आज 5 हजार किमी पेक्षा जास्त अंतरावरील लक्ष्यांवर मारा करण्याची क्षमता असलेल्या अग्नी-5 अणुसक्षम (Agni-5 Ballistic Missile Trial) बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची रात्र चाचणी घेतली होती. ही चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली (Agni 5 Trial Successfully) आहे. संरक्षण सूत्रांनी ही माहिती दिली आहे. नवीन तंत्रज्ञान आणि उपकरणे प्रमाणित करण्यासाठी क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती.
-
India today successfully carried out the night trials of the Agni-5 nuclear-capable ballistic missile which can hit targets beyond 5,000 kms: Defence sources pic.twitter.com/AniA4Xgzdy
— ANI (@ANI) December 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">India today successfully carried out the night trials of the Agni-5 nuclear-capable ballistic missile which can hit targets beyond 5,000 kms: Defence sources pic.twitter.com/AniA4Xgzdy
— ANI (@ANI) December 15, 2022India today successfully carried out the night trials of the Agni-5 nuclear-capable ballistic missile which can hit targets beyond 5,000 kms: Defence sources pic.twitter.com/AniA4Xgzdy
— ANI (@ANI) December 15, 2022
चाचणी यशस्वी - भारत-चीन यांच्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली असताना, भारताने शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या ‘अग्नि-5’ या शक्तीशाली क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ((Agni-5 Ballistic Missile Trial) ) केली आहे. आता हे क्षेपणास्त्र रात्रीही हल्ला करण्यास सक्षम ((Agni-5 Ballistic Missile) आहे. तब्बल पाच हजार किलोमीटर पेक्षा अधिक दूरचे लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे.
नवीन उपकरणे वापरली - संरक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले की, क्षेपणास्त्रावर नवीन तंत्रज्ञान आणि उपकरणं वापरण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत आवश्यकता भासल्यास रेंज वाढवण्याची क्षमता सिद्ध केली आहे. हे क्षेपणास्त्र डीआरडीओ आणि भारत डायनेमिक्स लिमिटेडने संयुक्तपणे विकसित केले आहे.