न्यूयॉर्क India Slams Pakistan : पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान अनवारुल हक काकर यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताविरोधात अनेक आरोप केले होते. मात्र त्यांच्या आरोपांना भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पाकव्याप्त काश्मीर खाली करा, दहशतवादाला आवरा आणि पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक नागरिकांवर होणारे अन्याय थांबवा, असा हल्लाबोल भारतानं केला आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या प्रथम सचिव पेटल गेहलोत यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर हा हल्लाबोल केला आहे.
-
First Secretary at United Nations for 2nd Committee of UNGA, Petal Gahlot says "As a country with one of the world's worst human rights records, particularly when it comes to minority and women's rights, Pakistan would do well to put its own house in order before venturing to… pic.twitter.com/GV52GmDZMV
— ANI (@ANI) September 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">First Secretary at United Nations for 2nd Committee of UNGA, Petal Gahlot says "As a country with one of the world's worst human rights records, particularly when it comes to minority and women's rights, Pakistan would do well to put its own house in order before venturing to… pic.twitter.com/GV52GmDZMV
— ANI (@ANI) September 23, 2023First Secretary at United Nations for 2nd Committee of UNGA, Petal Gahlot says "As a country with one of the world's worst human rights records, particularly when it comes to minority and women's rights, Pakistan would do well to put its own house in order before venturing to… pic.twitter.com/GV52GmDZMV
— ANI (@ANI) September 23, 2023
पाकिस्ताननं काश्मीरवरील अनाधिकृत ताबा सोडावा : UNGA समितीच्या बैठकीत पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान अनवारुल हक काकर यांनी काश्मीरचा राग आळवला होता. त्यावर संयुक्त राष्ट्र संघातील सचिव पेटल गेहलोत यांनी भारताच्या वतीनं उत्तर देण्याचा अधिकार वापरला. यावेळी पेटल गेहलोत यांनी पाकिस्तानला चांगलचं फटकारलं. पाकिस्ताननं भारताच्या भूमीवर अनाधिकृतपणानं ताबा मिळवला आहे. त्यामुळे पाकिस्ताननं अगोदर पाकव्याप्त काश्मीर खाली करावा, असं पेटल गेहलोत यांनी यावेळी सुनावलं. पाकिस्ताननं सीमेपलीकडून होणारा दहशतवाद थांबवावा आणि पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकावर होणाऱ्या मानवाधिकारांच्या उल्लंघनावर आवर घालावा, असे खडे बोल भारतानं पाकिस्तानला सुनावले आहेत.
-
#WATCH | First Secretary at United Nations for 2nd Committee of UNGA, Petal Gahlot says "Pakistan has become a habitual offender when it comes to misusing this August forum to peddle baseless and malicious propaganda against India. Member states of the United Nations and other… pic.twitter.com/eIyynFFa1Q
— ANI (@ANI) September 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | First Secretary at United Nations for 2nd Committee of UNGA, Petal Gahlot says "Pakistan has become a habitual offender when it comes to misusing this August forum to peddle baseless and malicious propaganda against India. Member states of the United Nations and other… pic.twitter.com/eIyynFFa1Q
— ANI (@ANI) September 23, 2023#WATCH | First Secretary at United Nations for 2nd Committee of UNGA, Petal Gahlot says "Pakistan has become a habitual offender when it comes to misusing this August forum to peddle baseless and malicious propaganda against India. Member states of the United Nations and other… pic.twitter.com/eIyynFFa1Q
— ANI (@ANI) September 23, 2023
पाकिस्तानला भाष्य करण्याचा अधिकार नाही : जम्मू-काश्मीर आणि लडाख हा केंद्रशासित प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित प्रकरणं हा भारताच्या अंतर्गत बाबींचा विषय आहेत. पाकिस्तानला आमच्या देशांतर्गत घडामोडींवर भाष्य करण्याचा अधिकार नसल्याचं पेटल गेहलोत यांनी यावेळी स्पष्ट केलं. जगातील सगळ्यात जास्त मानवाधिकार उल्लंघनाच्या घटना पाकिस्तानात होतात. अल्पसंख्यांक महिलांची पाकिस्तानात मोठी दयनिय अवस्था आहे. त्यामुळे पाकिस्ताननं अगोदर आपलं घर संभाळावं, असंही पेटल गेहलोत यांनी यावेळी बजावलं आहे. पाकिस्ताननं राजकीय भावनेनं प्रेरित होऊन जागतिक व्यासपीठाचा गैरवापर केला आहे. हा एक प्रकारचा गुन्हा असल्याचंही पेटल गेहलोत यांनी यावेळी नमूद केलं.
हेही वाचा :