ETV Bharat / bharat

United Nations : पाकिस्तान दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान; भारताचा पाकिस्तानला टोला - Pakistan is a sponsor of terrorism

संयुक्त राष्ट्रमधील भारताच्या स्थायी मिशनचे समुपदेशक आर. मधु सूदन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील ( United Nations Security Council ) एका चर्चेदरम्यान म्हणाले की, सदस्य राष्ट्रांना चांगल्या प्रकारे माहित आहे की, पाकिस्तान आतंकवाद्यांना आश्रय देणे, मदत करणे आणि सक्रिय स्वरुपात पाठिंबा देण्यात इतिहास निर्माण केला आहे.

india
india
author img

By

Published : Jan 26, 2022, 1:26 PM IST

न्यूयॉर्क: दहशतवादापासून नागरिकांना असलेला धोका ( The threat to civilians from terrorism ) अधोरेखित करताना भारताने मंगळवारी सांगितले की 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना पाकिस्तानचे संरक्षण आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 'सशस्त्र संघर्षात नागरिकांचे संरक्षण' या विषयावर चर्चा करताना भारताकडून सांगण्यात आले की, सदस्य राष्ट्रांना चांगल्या प्रकारे माहित आहे की, पाकिस्तानने आतंकवाद्यांना आश्रय देणे, मदत करणे आणि सक्रिय स्वरुपात पाठिंबा देण्यात इतिहास निर्माण करत आहे.

संयुक्त राष्ट्र (UN) मधील भारताच्या स्थायी मिशनचे समुपदेशक आर. मधु सुदान यांनी UNSC च्या 'सशस्त्र संघर्षातील नागरिकांची सुरक्षा' ( Protection of civilians in armed conflict ) या विषयावरील चर्चेदरम्यान ही टिप्पणी केली. भारताच्या समुपदेशकांनी ही टिप्पणी तेव्हा केली, जेव्हा एक पाकिस्तानी राजनयिकाने भारता विरुद्ध 'खोटा आणि दुर्भावनापूर्ण प्रचार' करण्यासाठी संयुक्त राष्ट्र द्वारा देण्यात आलेल्या व्यासपीठाचा दुरुपयोग केला. ते म्हणाले, ही पहिली वेळ नाही की, पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी आमच्या देशाविरुद्ध खोटे आणि दुर्भावनापूर्ण प्रचार केला आहे. त्यांनी असे करणयासाठी संयुक्त राष्ट्राकडून देण्यात आलेल्या व्यासपीठाचा दुरुपयोग केला आहे. ज्यामुळे जगाचे लक्ष पाकिस्तानच्या दुखद परिस्थिवरुन हटवले जावे. पाकिस्तान असा देश आहे, ज्या ठिकाणी दहशतवादी सामान्य नागरिकांप्रमाणे मोफत पास आनंद घेतात.

भारतीय समुपदेशकांनी उल्लेख केला की, पाकिस्तान आतंकवाद्यांना आश्रय देणे, मदत करणे आणि सक्रिय स्वरुपात पाठिंबा देण्यात इतिहास निर्माण केला आहे. ते म्हणाले, हा एक असा देश आहे, जो जागतिक स्तरावर दहशतवादाचा प्रायोजक ( Pakistan is a sponsor of terrorism ) म्हणून ओळखला जातो आणि सुरक्षा परिषदेने बंदी घातलेल्या सर्वाधिक दहशतवाद्यांना होस्ट करण्याचा त्यांचा जागतिक विक्रम आहे. एवढेच नाही तर, आज जगभरातील दहशतवादी हल्ल्याची तार कुठे ना, कुठे पाकिस्तान सोबत जोडले गेलेले आहे.

मधु सूदन यांनी सुरक्षा परिषदेला आठवण करुन दिली की, पाकिस्तानचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांना ओसामा बिन लादेन सहित इतर दहशतवाद्यांचे समर्थनासाठी कठोर शब्दात निंदा केली पण ते त्याच मार्गावर चालत आहेत. ते म्हणाले, आपण आज नागरिकांच्या सुरक्षेवर चर्चा करत आहोत. नागरिकांना सर्वात मोठा धोका हा दहशतवाद्यांपासून आहे. जसे की मी पहिल्यांदा उल्लेख केला आहे की, 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील (2008 Mumbai terror attacks) गुन्हेगारांना ते ज्या देशाचे (पाकिस्तान) प्रतिनिधित्व करत आहेत त्यांचे संरक्षण आहे.

जम्मू आणि काश्मीर आणि लडाखच्या मुद्द्यावर, भारतीय समुपदेशक पुन्हा म्हणाले, 'संपूर्ण जम्मू काश्मीर आणि लडाख भारताचा एक अभिन्न आणि अविभाज्य भाग होता, आणि नेहमी राहील, भले ही पाकिस्तानचे प्रतिनिधी काहीही मानू, आम्ही पाकिस्तानला सांगत आहोत की, त्यांनी आपले अवैध कब्जा केलेले सर्व क्षेत्र लवकर रिकामे करावेत.

(एएनआय)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.