कोलकाता: भारतासारख्या देशात जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी लोकांच्या हालचालींवर पूर्ण बंदी आणि प्रवासावरील बंदीयासारख्या सर्वसमावेशक निर्बंधांचा (Restrictions on movement, travel or all) दृष्टीकोन हा फायद्याचा नाही. त्याचा उलट परिणाम होऊ शकतो हे सांगताना ऑफरिन यांनी म्हणले आहे की, जीवन आणि उपजीविका या दोन्हींचे रक्षण करण्याची गरज आहे, भारत आणि जगभरातील सार्वजनिक आरोग्या बाबत विषाणू किती सांसर्गिक आहे, रोगाची तीव्रका, लसी पासुनचे संरक्षण, आणि सामान्य लोक धोका कसे ओळखतात या चार महत्वाच्या मुद्यांवर बोलले पाहिजे.
वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, जागतिक आरोग्य संघटना - डब्लूएचओ लोकांच्या हालचाली, प्रवास बंदी किंवा व्यपक निर्बंधांची शिफारस करत नाही.व्यापकपणे पाहिले असता असे निर्बंध हे घातक ठरु शकतात. भारतात लोकसंख्या आणि भौगोलिक प्रसारामध्ये विविधता आहे. त्यामुळे साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी जोखीमेवर अधारित दृष्टीकोन हा सार्वजनीक आरोग्याच्या बाबतीत समझदारीचा ठरतो.
रोगाच्या साथीची परस्थिती लक्षात घेता, उपलब्ध सार्वचनिक आरोग्य सोयी सुविधा, सामाजिक आणि आर्थिक संदर्भाने रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने उपाययोजना आखल्या पाहिजेत. भारतात कोरोना रुग्णांचा आकडा मंगळवारी 3.76 कोटींवर गेल्यावर त्यांचे हे विधान आले आहे. एकीकडे जागतिक आरोग्य संघटना सरकारांना प्रवास आणि संबंधित धोके कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना देत असते पण ऑफरिन म्हणतात की, 'काय करावे आणि काय नाही'या सर्व गोष्टींचे पालन केले तर लाॅकडाऊन (Lockdown) लावण्याची गरज भासणार नाही.