नवी दिल्ली: भारतात कोरोना रुग्णंमध्ये आणखी एक वाढ (increase in corona patients) नोंदवली गेली आहे. गेल्या 24 तासांत 2 लाख 71 हजार 202 नवीन संसर्ग नोंदले गेले आहेत, शनिवारपेक्षा ते 2 हजाक 369 ने जास्त असुन गेल्या 241 दिवसांतील सर्वाधिक आहेत.तसेच, गेल्या 24 तासात 1 लाथ 38 हजार 331 कोरोना रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे, तर राष्ट्रीय कोविड-19 रिकव्हरी रेट 94.51% पर्यंत कमी झाला आहे.
देशातील सक्रिय प्रकरणांची संख्या 15 लाख 50 हजार377 वर पोहोचली आहे, जी 222 दिवसांतील सर्वोच्च आहे, तर दैनिक सकारात्मकता दर 16. 66% वरून 16.28% पर्यंत खाली आला आहे आणि साप्ताहिक सकारात्मकता दर 13.69% आहे.
ताज्या प्रकरणांमध्ये 7,743 ओमायक्रॉनचे रुग्ण देखील समाविष्ट आहेत, शनिवारपासून 28.17% च्या वाढीसह. देशात गेल्या 24 तासांत कोरोना मुळे 314 नवीन मृत्यूची नोंद झाली असून एकूण मृतांची संख्या 4लाख 86 हजार 066 वर पोहोचली आहे.
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात दिल्या गेेलेल्या एकत्रित डोसची संख्या 156.76 कोटींहून अधिक झाली आहे, असे मंत्रालयाने (Ministry of Health) म्हटले आहे. आतापर्यंत 70. 24 कोटी पेक्षा जास्त कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत त्यापैकी 16. 65 कोटी चाचण्या गेल्या 24 तासांत घेण्यात आल्या आहेत.