नवी दिल्ली - देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात घट झाली आहे. मागील 24 तासात देशात 2 लाख 22 हजार नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. जवळपास 40 दिवसांनंतर हा नव्या कोरोना रुग्णांचा आकडा सर्वात कमी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - सिप्ला 'या' औषधाची करणार विक्री; मृत्यूदर कमी होत असल्याचा दावा
दररोज 100 हून अधिक कोरोनाबाधितांची संख्या नोंदवणाऱ्यां जिल्ह्यांचा आकडा आता कमी होत आहे. 28 एप्रिल ते 4 मे या आठवड्यात 100 पेक्षा अधिक नवे रु्ग्ण आढळणारे 531 जिल्हे होते. तो आकडा आता कमी होत 431 पर्यंत खाली आला आहे. त्यामुळे देशातील जिल्हा पातळीवरील नव्या कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 22 हजार 315 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 454 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, देशात 3 लाख 2 हजार 544 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
हेही वाचा - महाविकास आघाडी सरकारने सारथीची वाट लावली - चंद्रकांत पाटील