ETV Bharat / bharat

कोरोनाचा धोका वाढतोय! 35 हजार 871 नव्या रुग्णांची नोंद, 172 जणांचा मृत्यू

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 1 कोटी 14 लाख 74 हजार 605 वर पोहचली आहे. तर 1 कोटी 10 लाख 63 हजार 25 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 2 लाख 52 हजार 364 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर 1 लाख 59 हजार 216 जणांचा मृत्यू झालाय. तर आतापर्यंत 3 कोटी 71 लाख 43 हजार 255 जणांना कोरोना लस टोचवण्यात आली आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट
author img

By

Published : Mar 18, 2021, 12:54 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून गेल्या 24 तासांमध्ये 35 हजार 871 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 17 हजार 741 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मृत्यूंची संख्या दिवसांगणिक वाढत चालली असून 172 जणांचा मृत्यू झाला.

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 1 कोटी 14 लाख 74 हजार 605 वर पोहचली आहे. तर 1 कोटी 10 लाख 63 हजार 25 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 2 लाख 52 हजार 364 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर 1 लाख 59 हजार 216 जणांचा मृत्यू झालाय. तर आतापर्यंत 3 कोटी 71 लाख 43 हजार 255 जणांना कोरोना लस टोचवण्यात आली आहे.

देशात 2 हजार 420 कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळा असून यात 1 हजार 225 सरकारी आणि 1 हजार 195 खासगी प्रयोग शाळा आहेत. कोरोनाचा प्रसार झाल्यापासून आतापर्यंत 23,03,13,163 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर बुधवारी 10,63,379 चाचण्या पार पडल्या. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यात बहुतांश रुग्ण सौम्य स्वरुपाच्या कोरोनाने ग्रस्त आहेत.

लसीकरण केंद्राची माहिती गुगलकडून -

सरकारने लसीकरणाची मोहिम व्यापकस्तरावर सुरू केली आहे. अशावेळी गुगलकडून नागरिकांनी वेळेवर माहिती जाण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. कोरोनाच्या लढ्यात लसीकरण केंद्राची माहिती वापरकर्त्यांना सर्च, मॅप्स आणि असिस्टंटकडून मिळण्यासाठी गुगल इंडियाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी गुगल इंडिया आरोग्य मंत्रालय, बिल आणि मेलिंडा गेट्स फांउडेशनची मदत घेत आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबविल्याने पूर्वस्थिती होण्यासाठी मदत होणार आहे.

हेही वाचा - दीदी बोले 'खेला होबे' बीजेपी बोले 'विकास होबे'; मोदींचा ममतांवर हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.