ETV Bharat / bharat

कोरोना अपडेट : गेल्या २४ तासांमध्ये देशात १ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद; ४७८ बळी - भारत कोरोना रुग्ण

देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 65 हजार 101 झाली आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी, 7 लाख 41 हजार 830 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 1 कोटी, 16 लाख, 82 हजार 136 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत...

India reports 1,03,558 new COVID19 cases, 52,847 discharges in last 24 hours
कोरोना अपडेट : गेल्या २४ तासांमध्ये देशात १ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद; ४७८ बळी
author img

By

Published : Apr 5, 2021, 9:42 AM IST

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात एक लाख 3 हजार 558 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी, 25 लाख, 89 हजार 67 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी याबाबत माहिती दिली.

यासोबतच, काल दिवसभरात एकूण 478 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 65 हजार 101 झाली आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी, 7 लाख 41 हजार 830 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 1 कोटी, 16 लाख, 82 हजार 136 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. रविवारी राज्यात तब्बल ५७ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली, तर २२२ रुग्णांचा मृत्यू झाला.

दरम्यान, देशात आतापर्यंत एकूण सात कोटी, 91 लाख, 5 हजार, 163 नागरिकांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

हेही वाचा : 'पंतप्रधान मोदी सिंडिकेट नंबर 1, तर अमित शाह सिंडिकेट नंबर 2'; ममता बॅनर्जी यांची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.