नवी दिल्ली - आज पुन्हा एकदा रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळाली. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. देशात गेल्या 24 तासांत नवे 39,796 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 723 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 42,352 रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर देशात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 4 लाख इतकी आहे. देशाचा रिकव्हरी रेट 97.11 टक्क्यांवर आला आहे. याचबरोबर भारताने लसीकरणात 35 कोटींची टप्पा पार केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
देशातील कोरोना रुग्णांची स्थिती...
- एकूण रुग्ण : 3,05,85,229
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : 2,97,00,430
- सक्रिय रुग्ण संख्या : 4,82,071
- एकूण मृत्यू : 4,02,728
- एकूण लसीकरण : 35,28,92,046
गेल्या 24 तासांत 15,22,504 चाचण्या पार पडल्या आहेत. आतापर्यंत कोरोना चाचण्यांनी देशात 41 कोटीचा आकडा गाठला आहे. देशातील कोरोना मृत्यूदर 1.32 टक्क्यांवर पोहोचला असून रिकव्हरी रेट 97 टक्क्यांहून जास्त आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्येचं प्रमाण 1.58 टक्क्यांपर्यंत कमी झालं आहे. तसेच गेल्या 24 तासांत 14,81,583 जणांना लस टोचवण्यात आली आहे. तर आतापर्यंत 35,28,92,046 जणांचे लसीकरण झाले आहे.
महाराष्ट्रातील स्थिती...
महाराष्ट्रात रविवारी (4 जुलै) नवीन 9,336 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर, 123 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 3,378 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 58,48,693 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,23,225 सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत एकूण 1,23,030 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.91% झाले आहे. ही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला कोरोनाच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट संदर्भात सतर्क राहण्याचे सूचित केले आहे.
कोरोनावर कोव्हॅक्सिन लस 77.8 टक्के प्रभावी -
कोरोनाचा कहर असून रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. देशात सध्या भारत बायोटेकची लस कोव्हॅक्सिन, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची लस कोविशिल्ड आणि रशियाची लस स्पूटनिक व्ही या तीन लसींच्या माध्यमातून लसीकरण सुरू आहे. कोव्हॅक्सिन ही कोरोनाच्या सामान्य लक्षणांवर 77 पूर्णांक 8 दशांश टक्के प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकनं केला आहे. तसेच कोरोनाच्या डेल्टा या नव्या स्वरुपावरही लस 65 टक्के प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकनं केलं आहे.