हैदराबाद - देशातील कोरोनाची दुसरी लाट संपूर्णपणे ओसरलेली नाही. देशात नवीन 35,499 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 447 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात आजवर एकूण 3,19,69,954 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकूण 4,28,309 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सोमवारी सकाळी 8 वाजता जाहीर केली आहे. देशात 4,02,188 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार 8 ऑगस्टपर्यंत कोरोना चाचणीकरिता 48,17,67,232 नमुने घेण्यात आले आहेत. तर रविवारी कोरोना चाचणीकरिता 13,71,871 नमुने घेण्यात आले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा-मडगाव कुंकल्लीत वर्कशॉपला आग लागून सहा गाड्या जळून खाक
व्हॉट्सअपवर मिळणार कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र
देशातील नागरिकांना आता कोरोनाची लस घेतल्यानंतर काही सेकंदातच लस घेतल्याचे प्रमाणपत्र व्हॉट्सअॅपद्वारे मिळणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या कार्यालयाने रविवारी याबाबतची माहिती दिली. सध्या, नागरिक कोविन पोर्टलवर लॉगइन केल्यानंतर त्यांचे कोरोना लस प्रमाणपत्र डाऊनलोड करत आहेत.
हेही वाचा-गुजरात : रस्त्यालगतच्या झोपडीत ट्रक घुसल्याने भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू