ETV Bharat / bharat

Submarine Vagir : भारतीय नौदलाला मिळेल बळकटी ; पाणबुडी 'वगीर' 23 जानेवारीला होणार ताफ्यात दाखल! - पाणबुडी वगीर भारतीय नौदलात दाखल

चीनच्या वाढत्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदल हिंद महासागरावर लक्ष केंद्रित करून आपली सागरी क्षमता वाढविण्याचे काम करत आहे. 23 जानेवारीला पाचवी स्कॉर्पीन श्रेणी पाणबुडी 'वगीर' नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. 20 डिसेंबर रोजी एमडीएलने ही पाणबुडी भारतीय नौदलाला दिली होती.

Submarine Vagir
पाणबुडी 'वगीर'
author img

By

Published : Jan 21, 2023, 10:28 AM IST

नवी दिल्ली : पाचवी स्कॉर्पीन श्रेणी पाणबुडी 'वगीर' 23 जानेवारीला भारतीय नौदलात दाखल होणार आहे. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी माहिती दिली आहे. प्रकल्प-75 अंतर्गत बांधण्यात आलेली ही पाणबुडी नौदलाच्या लढाऊ क्षमतेला बळ देणार आहे. एकीकडे चीन हिंद महासागर क्षेत्रात आपली उपस्थिती वाढवत आहे, अशावेळी या पाणबुडीचे नौदलाच्या ताफ्यात दाखल होणे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

  • Mumbai | The fifth Kalvari-class submarine 'Vagir' will be commissioned in the Indian Navy on January 23. It has been built indigenously at Mazagon Dock Shipbuilders Limited in Mumbai. pic.twitter.com/QFNdXK2ANo

    — ANI (@ANI) January 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यापूर्वी चार पाणबुड्या दाखल : यावेळी नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर हरी कुमार प्रमुख पाहुणे म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. चीनच्या वाढत्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदल हिंद महासागरावर लक्ष केंद्रित करून आपली सागरी क्षमता वाढविण्याचे काम करत आहे. प्रोजेक्ट-75 मध्ये स्कॉर्पीन डिझाइनच्या सहा पाणबुड्यांचे स्वदेशी बांधकाम समाविष्ट आहे. फ्रान्सच्या नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने या पाणबुड्या मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) येथे बांधल्या जात आहेत. कलवरी वर्गाच्या चार पाणबुड्या या पूर्वीच भारतीय नौदलात दाखल झाल्या आहेत. पूर्वीचे वगीर 1 नोव्हेंबर 1973 रोजी कार्यान्वित झाले होते आणि त्याने प्रतिबंधात्मक गस्तीसह अनेक ऑपरेशनल मोहिमा हाती घेतल्या होत्या. सुमारे तीन दशके देशाची सेवा केल्यानंतर जानेवारी 2001 मध्ये ही पाणबुडी बंद करण्यात आली होती.

विविध मोहिमा हाती घेण्यास सक्षम : एका अधिकाऱ्याने सांगितले की, '12 नोव्हेंबर 2020 रोजी लाँच करण्यात आलेल्या 'वगीर' पाणबुडीला तिच्या नवीन अवतारात आजपर्यंतच्या सर्व स्वदेशी बनवलेल्या पाणबुड्यांमध्ये सर्वात कमी बांधणीचा वेळ मिळाला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सागरी चाचण्या सुरू केल्यानंतर या पाणबुडीची समुद्रात पहिली टेस्ट घेण्यात आली. अनेक सर्वसमावेशक स्वीकृती तपासण्या आणि कडक समुद्री चाचण्यांनंतर या पाणबुडीला नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आले आहे. ही पाणबुडी MDL ने 20 डिसेंबर रोजी भारतीय नौदलाला दिली होती. ' वगीर भारताच्या सागरी हितसंबंधांना पुढे नेण्यासाठी भारतीय नौदलाच्या क्षमतेला चालना देईल. ही भूपृष्ठविरोधी युद्ध, पाणबुडीविरोधी युद्ध, पाळत ठेवणे आणि गुप्त माहिती गोळा करणे यासह विविध मोहिमा हाती घेण्यास सक्षम आहे, असे अधिकारी म्हणाले.

हेही वाचा : INS Mormugao: नौदलाला मिळाली नवी ताकद.. घातक क्षेपणास्त्र नाशक युद्धनौका मोरमुगाव नौदलात दाखल..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.