ETV Bharat / bharat

INDIA Meeting : इंडियाच्या बैठकीत मोठा निर्णय, 'या' ठिकाणी होणार पहिली जाहीर रॅली - इंडिया आघाडी

INDIA Meeting : शरद पवार यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी 'इंडिया' आघाडीची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती, राजदचे तेजस्वी यादव आणि तसेच सीपीआयचे डी राजा उपस्थित होते.

INDIA Meeting
इंडिया बैठक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2023, 9:54 PM IST

नवी दिल्ली INDIA Meeting : बुधवारी (१३ सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी 'इंडिया' आघाडी समन्वय समितीची बैठक पार पडली. बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली, मात्र यावर कोणताही मोठा निर्णय झाला नाही. या बैठकीत राज्यांतर्गत इंडिया आघाडीच्या पक्षांमध्ये सहमती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याच ठरवण्यात आलं.

समन्वय समितीत काय घडलं :

  • इंडिया आघाडीची पहिली रॅली भोपाळमध्ये होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात रॅलीचं आयोजन करण्यात येईल.
  • जातीनिहाय जणगणनेच्या मुद्यावर इंडिया आघाडीच्या पक्षांमध्ये एकमत आहे.
  • इंडिया आघाडीचे सर्व पक्ष हा मुद्दा जनतेसमोर ठळकपणे मांडतील.
  • समन्वय समितीची बैठक होतच राहणार. पुढील बैठकीची माहिती लवकरच दिली जाईल.
  • मध्य प्रदेशात मोठे घोटाळे झाले आहेत. त्यामुळे रॅलीची सुरुवात तेथूनच करायला हवी - पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती
  • बैठकीत इंडिया अलायन्सचे सदस्य महागाई आणि बेरोजगारीचे मुद्दे जोरकसपणे मांडण्याबाबत बोलले.
  • इंडिया आघाडीतील ज्या पक्षांनी जागा जिंकल्या आहेत, त्या जागा त्यांच्यासोबतच राहतील. परंतु सध्या एनडीएच्या ताब्यात असलेल्या जागांवर अद्याप निर्णय झालेला नाही. - ओमर अब्दुल्ला
  • इंडिया आघाडी विरोधात बातम्या चालवणाऱ्या काही माध्यम समूहांच्या शोमध्ये आघाडीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार नाहीत.
  • आजच्या बैठकीला १२ पक्षांचे नेते उपस्थित होते.
  • #WATCH | On BJP calling the coordination committee meeting as an anti-Hindu meeting, Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut says, "No one in this country is anti-Hindu...Every religion in this country is respected..." pic.twitter.com/5jqMWXvusm

    — ANI (@ANI) September 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

इंडिया आघाडीची बैठक हिंदूंना नष्ट करण्यासाठी : इंडिया आघाडीच्या बैठकीवरून भाजपा नेत्यांनी विरोधकांना टोमणा मारला. 'या आघाडीचं नेतृत्व कोण करणार, त्याचं नाव निश्चित होईल, अशी आशा लोकांना होती. या बैठकीतून जागावाटपाचा काही फॉर्म्युला ठरेल, अशीही अपेक्षा होती. सनातनविरोधी विधानांवरही चर्चा झाली नाही. त्यामुळे ही बैठक चहापानापेक्षा अधिक काही नव्हती. ही बैठक टाय-टाय फिस झाली', असं भाजपा नेते सुशीलकुमार मोदी म्हणाले. इंडिया आघाडीची बैठक हिंदूंना नष्ट करण्यासाठी आहे, असं केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटलं.

जागावाटपावर लवकरच चर्चा होणार : या बैठकीनंतर बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, बैठक अत्यंत सकारात्मक होती. सर्व विषयांवर चर्चा झाली. पहिली रॅली भोपाळमध्ये होणार असून जागावाटपावर लवकरच चर्चा होणार आहे. जातीनिहाय जणगणनेवरही चर्चा होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. बैठकीत बेरोजगारी आणि महागाई या मुद्द्यांवर चर्चा झाली, असं पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितलं.

  • #WATCH | National Conference leader Omar Abdullah says, "The agenda will be known during the meeting...Seat sharing & what formula to be used & how new members can be brought to the alliance will be discussed..."

    On TMC MP and national general secretary Abhishek Banerjee not… pic.twitter.com/Lws9Qvwo8h

हेही वाचा :

  1. special session of parliament : संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा काय? सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.