ETV Bharat / bharat

Breaking News Live : नाशकातील उद्योजकाच्या खुनाचे उलडणार का गुढ? - National Politics

Breaking News Live
Breaking News Live
author img

By

Published : Sep 11, 2022, 7:13 AM IST

Updated : Sep 11, 2022, 11:03 PM IST

22:49 September 11

नाशकातील उद्योजकाच्या खुनाचे उलडणार का गुढ?

नाशिक शहरातील एकलहरे रोड येथील फर्निचर व्यावसायिक शिरीष सोनवणे (वय 56) हे बेपत्ता होते.परंतु,त्यांचा मृतदेह हा मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील कालव्यात मिळून आला. मृत सोनवणे यांच्या शरिरावर गंभीर जखमा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. हा घात की अपघात याबाबत पोलीस तपास करत आहे.

22:45 September 11

Mumbai Corona Update मुंबईत १८७ रुग्णांची तर १ मृत्यूची नोंद

मुंबई - मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार कमी झाला असून आज १८७ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या १७११ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. Body:१८७ नवे रुग्ण -
मुंबईत आज ११ सप्टेंबरला ४,८०१ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १८७ रुग्णांची नोंद झाली. आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. ३७५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ४७ हजार ९७८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख २६ हजार ५४९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १७११ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २९६२ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०२४ टक्के इतका आहे.

22:39 September 11

इंदूर डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या इमारतीला भीषण आग

इंदूर डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या इमारतीला आग लागली. ही आग भीषण आहे.

21:12 September 11

कूचबिहार येथे देशी बनावटीचे बॉम्बस्फोट, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी

सीतालकुची, कूचबिहार येथे भाजपच्या आंदोलनाच्या दरम्यान अनेक देशी बनावटीचे बॉम्बस्फोट झाले. यामध्ये भाजपचे 2 कार्यकर्ते जखमी झाले.

18:45 September 11

शिवसेना फुटीला उद्धव ठाकरेंची कार्यशैली जबाबदार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. शिवसेना फुटीला ठाकरेंची कार्यशैली जबाबदार असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. ते एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. शिवाय त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवणे ही त्यांची सर्वात मोठी राजकीय चूक असल्याचेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

17:56 September 11

भारत जोडो यात्रा तामिळनाडूमधील नेमम येथे संपला, पहा व्हिडिओ

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केरळमधील नेयट्टींकारा येथून सुरू केली. ही यात्रा तामिळनाडूमधील नेमम येथे संपली.

17:12 September 11

धर्मगुरू शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन

भोपाळ - हिंदू धर्मगुरू शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे रविवारी निधन झाले. ते 99 वर्षांचे होते. शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथील झोतेश्वर मंदिरात अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते.

16:49 September 11

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळेच्या सुरक्षा रक्षकाला अटक

मुंबई - 15 वर्षीय मुलीचा पाठलाग आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शाळेच्या सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे. आरोपी तिचा पाठलाग करायचा, शाळेत एकटी दिसल्यावर तिला अयोग्य स्पर्श करायचा आणि व्हिडिओ कॉल करायचा. संबंधित आरोपींवर कलमान्वे गमदेवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

16:08 September 11

दादरमध्ये शिवसैनिकांनी आमदार सदा सरवणकराचे फाडले बॅनर

शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वाद आता चांगलाच पेटला आहे. याच पार्श्वभूमीवर दादरमध्ये शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर आणि त्यांचे पुत्र समाधान सरवणकर यांचे बॅनर शिवसैनिकांनी फाडल्याची माहिती पुढे आली आहे.

15:16 September 11

हैदराबादमध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज

हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर तेलंगाणा आणि राज्याच्या मध्यवर्ती भागात पुढील 24 तासांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

15:09 September 11

हवेत गोळीबार केल्याप्रकरणी आमदार सरवणकरांसह सहा जणांवर गुन्हा दाखल

शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये राडा झाला. यात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांनी हवेत गोळी केले. आता या प्रकरणी सरवणकर यांच्यासह त्यांचा मुलगा आणि इतर सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दंगल आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या दोघांमध्ये झालेल्या हाणामारीत ठाकरे गटातील 30 जणांवर पोलिसांनी यापूर्वी गुन्हा दाखल केला होता.

13:50 September 11

एफआयआर होत नाही तोपर्यंत हलणार नाही, खासदार अरविंद सावंत यांचा पवित्रा

शिंदे आणि ठाकरे गटात अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकी दरम्यान झालेल्या वादाचे पर्यवसन आता गोळीबारात झाले आहे. काल मध्यरात्रीपासून हा वाद चिघळला असून आता हा वाद दादर पोलीस ठाण्यात पोचला आहे. शिंदे गटामार्फत शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर पाच शिवसैनिकांना अटक करण्यात आले. मात्र, ठाकरे गटाकडून महेश सावंत यांनी तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोप खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.

12:48 September 11

शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत आमदाराला धक्काबुक्की

अमरावतीत शिवाजी शिक्षण संस्थेची आज रविवारी निवडणूक सुरु आहे. या निवडणुकीत राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. आमदार देवेंद्र भुयार यांना यात धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती आहे.

11:49 September 11

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 21 वी ऊस परिषद 15 ऑक्टोबर रोजी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 21 वी ऊस परिषद 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी याबाबतची घोषणा केली. नेहमीप्रमाणे जयसिंगपूर येथे विक्रमसिंह क्रीडांगण मैदानावरती ही सभा होणार आहे. तसेच "जागर एफआरपीचा संघर्ष ऊस दराचा" यासाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात 9 दिवस मोठ्या सभा घेणार असल्याची घोषणाही केली.

09:00 September 11

जालना : भोकरदन तालुक्यात लम्पीने पाच जनावरे पॉझिटिव्ह, पशुपालक, शेतकऱ्यांची चिंता वाढली

सध्या देशातील अनेक भागात जनावरे 'लम्पी स्किन' या आजाराने ग्रासले असून, पशुपालक व शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. अशात आता या आजाराने भोकरदन तालुक्यातही दस्तक दिली असून, तालुक्यातील वरुड बुद्रुक या गावात शनिवारी पाच जनावरे 'लम्पी स्किन' या आजार पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

06:27 September 11

mbai Corona Update नाशकातील उद्योजकाच्या खुनाचे उलडणार का गुढ?

मुंबईत शिवसेना - शिंदे गटामध्ये राडा.

आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा शिवसैनिकांचा आरोप

आमदार सदा सरवणकर यांनी आरोप फेटाळले

Last Updated : Sep 11, 2022, 11:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.