जमुई: बिहारच्या जमुई जिल्ह्यात सोनो क्षेत्रात सोन्याचे भांडार (Gold Reserves in Sono Area of Jamui) सापडले आहे. केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदेत खासदार संजय जयस्वाल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, ही बाब माहिती झाल्यावर या भागातील लोकांमधे आनंद पहायला मिळत आहे.
मातीत सापडतात सोन्याचे कण
जमुईच्या सोनो क्षेत्राचा करमटिया मौजा देशातील सर्वात मोठे सोन्याचे भांडार म्हणून देशाच्या नकाशावर येऊ शकते. यामुळे हा भाग पुन्हा चर्चेत येउ शकतो. तेथील रहिवासी सांगतात येथे जमिनीत खुप आधी पासून सोने निघते. सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक असलेले कामादेव सिेह सांगतात की 1980-85 या काळात गावात अशी बातमी पसरली की या भागात सोने सापडत आहे. आम्ही जमीन खोदून त्यातील मातीला सुखनर नदीत जेव्हा धुतली तेव्हा त्यात सोन्याचे कण निघाले.
खोदकाम नंतर बंद पडले
भागात सरकारच्या वतीने खोदकाम सुरू झाले होते अनेक नेत्यांनी त्यावेळीही खुप प्रयत्न केले होते पण नंतर हे काम बंद झाले. आता पुन्हा येथे सोने असल्याचे सिध्द झाले आहे तेव्हा सरकारने पुन्हा या ठिकाणी खोदकाम सुरू करावे. त्या मुळे या भागाचा विकास होईल.चुरहैत पंचायत चे सरपंच चंद्रदेव पासवान यांनी पण म्हणले आहे की, या भागात सोन्याचे भांडार आहे. खुप वर्षाआधी या भागात काम करताना एकाला चमकणारा धातू सापडला तो त्याने एका सोनाराला दाखवला त्याने हे ए ग्रेड चे सोने आहे असे सांगितले होते.
उत्खनन सुरू होण्याची शक्यता
जायस्वाल यांनी या संदर्भाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रल्हाद जोशी यांनी सांगितलेकी बिहार देशाचे सगळ्यात मोठे सुवर्ण भांडार आहे. देशात एकूण 501.83 टन सोन्याचा प्राथमिक साठा आहे, त्यापैकी 654.74 टन सोन्याचा धातू आहे, त्यापैकी 44 टक्के सोने हे फक्त बिहारमध्ये सापडले आहे. जमुई जिल्ह्यातील सोनो क्षेत्रात 222.885 दशलक्ष टन सोन्याचा साठा सापडला आहे. ज्यात 37.6 टन धातूचा समावेश आहे. या भागात सोन्या व्यतिरिक्त, वेगवेगळ्या प्रकारचे खनिज तसेच मौल्यवान दगड पण आहेत. 15 वर्षापू्रर्वी जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या सर्वेक्षणानंतर खर्चिक असल्यामुळे खोदकाम बंद पडले मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आता खोदकाम स्वस्त होत असल्यामुळे लवकरच सोन्याचे उत्खनन सुरू होण्याची शक्यता आहे.