कांगडा (हिमाचल प्रदेश) : तिबेटचे अध्यात्मिक नेते दलाई लामा सोमवारी म्हणाले की, भारत हे त्यांचे कायमचे निवासस्थान असून ते भारतालाच प्राधान्य देतात. (india is my home said Dalai Lama). तवांग चकमकीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दलाई लामा (Dalai Lama after Tawang clash) कांगडा विमानतळावर म्हणाले, "मला वाटते युरोप, आफ्रिकेत आणि आशियामध्येही परिस्थिती सुधारत आहे. चीन आता अधिक लवचिक होतो आहे. मात्र चीनमध्ये परत जाण्यात काही अर्थ नाही. भारत हे सर्वोत्तम ठिकाण आहे. मी कांगडाच पसंत करतो. हे ठिकाण माझे कायमचे निवासस्थान आहे". (Dalai Lama on China).
भारत व चीनी सैन्यात संघर्ष : दलाई लामा यांचे हे विधान 9 डिसेंबरच्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर आले आहे. 9 डिसेंबरला चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी आणि भारतीय सैन्यात तवांग सेक्टरमधील एलएसी भागात संघर्ष झाला होता. या हाणामारीत दोन्ही बाजूचे काही जवान किरकोळ जखमी झाले होते. राज्यसभेत या घटनेवर निवेदन देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "9 डिसेंबर 2022 रोजी पीएलएच्या सैन्याने तवांग सेक्टरच्या यांगत्से भागात एलएसी ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र चीनच्या या प्रयत्नाला आमच्या सैन्याने खंबीरपणे तोंड दिले. दोन्ही सैन्यांमध्ये हाणामारी झाली ज्यामध्ये भारतीय सैन्याने पीएलएला आपल्या हद्दीत घुसण्यापासून रोखले आणि त्यांना त्यांच्या पोस्टवर परत जाण्यास भाग पाडले". ते पुढे म्हणाले की, "हाणामारीत दोन्ही बाजूंचे काही जवान जखमी झाले आहेत असून आमच्या बाजूने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भारतीय लष्कराने वेळीच हस्तक्षेप केल्याने पीएलएचे सैनिक त्यांच्या ठिकाणी परत गेले."
दलाई लामा दिल्लीत मुक्कामी : राजनाथसिंह पुढे म्हणाले, "या भागातील स्थानिक कमांडरने प्रस्थापित यंत्रणांनुसार या समस्येवर चर्चा करण्यासाठी 11 डिसेंबर 2022 रोजी त्यांच्या समकक्षांशी ध्वज बैठक घेतली. चीनी बाजूने अशा कृतींपासून परावृत्त होण्यास आणि सीमेवर शांतता आणि शांतता राखण्यास सांगितले होते. हा मुद्दा राजनयिक माध्यमांद्वारे चिनी बाजूकडून देखील उचलला गेला आहे." दरम्यान, दलाई लामा 2-3 दिवस दिल्लीत राहणार असून त्यानंतर ते अध्यात्मिक शिकवणी आणि इतर कार्यक्रमांसाठी बिहारमधील बोधगयाला जाणार आहेत. तसेच दिल्लीतील काही सभा आणि कार्यक्रमांव्यतिरिक्त दिल्लीत आरोग्य तपासणी देखील केली जाईल.