दिल्ली: राजेंद्र बाबूंचे सुरुवातीचे शिक्षण छपरा (बिहार) जिल्हा शाळा गया येथून झाले. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्यांनी कलकत्ता विद्यापीठाची प्रवेश परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली आणि नंतर कोलकात्याच्या प्रसिद्ध प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून कायद्याच्या क्षेत्रात डॉक्टरेट मिळवली. त्यांना हिंदी, इंग्रजी, उर्दू, बंगाली आणि पर्शियन भाषांचेही पूर्ण ज्ञान होते.त्यांच्या वडिलांचे नाव महादेव सहाय आणि आईचे नाव कमलेश्वरी देवी होते.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सामील: डॉ. राजेंद्र प्रसाद हे महात्मा गांधींपासून खूप प्रभावित होते आणि त्यांचे समर्थकही होते. चंपारण आंदोलनात गांधीजींना काम करताना पाहिल्यावर ते स्वत:ला रोखू शकले नाहीत आणि तेही त्यात सहभागी झाले. या आंदोलनादरम्यान डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी गांधीजींचे भक्कम समर्थन केले होते. राजेंद्र यांचे लहानपणी लग्न झाले होते. बालपणीच वयाच्या १३ व्या वर्षी राजवंशी देवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांचे वैवाहिक जीवन असेच आनंदी होते आणि त्यामुळे त्यांच्या अभ्यासात व इतर कामात कधीच अडथळा आला नाही. त्यांनी आपली कारकीर्द वकील म्हणून सुरू केली आणि नंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले.
संविधानाच्या बांधणीत योगदान: भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. राजेंद्र प्रसाद हे मूळचे बिहारचे होते. घटना समितीच्या ३६ सदस्यांपैकी एक होते. ११ डिसेंबर १९४६ ला, त्यांची समितीचे कायमस्वरूपी अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. मात्र, राज्यघटनेच्या बांधणीमध्ये राजेंद्र प्रसाद यांच्या योगदानाबाबत कोणीही बोलत नाही, अशी खंत तारा सिन्हा यांनी व्यक्त केली आहे.
कायद्याची रचना करताना मोलाचा वाटा: डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षांच्या आत राज्यघटनेची रचना करण्यात आली होती. राज्यघटनेतील पहिली धारणा ही डॉ. प्रसाद यांची होती. असे मत सिन्हा यांनी मांडले आहे. त्या पुढे म्हणाल्या की, या ऐतिहासिक दस्तावेजाच्या रचनेबाबत सामान्य नागरिकांना खूप कमी माहिती आहे. भारताच्या सर्वोच्च कायद्याची रचना करताना डॉ. प्रसाद यांचा मोलाचा वाटा होता. मात्र, प्रसाद यांचा क्वचितच उल्लेख केला जातो याबाबत सिन्हा यांनी निराशा व्यक्त केली.
प्रसाद यांचे योगदान हे अविस्मरणीय: राजकीय विश्लेषक आणि ए. एन. सिन्हा इंस्टिस्ट्यूट फॉर सोशल स्टडीजचे माजी संचालक डी. एम. दिवाकर यांनी सांगितले की, वसाहतीकरणानंतर भारताच्या उत्तर आणि दक्षिण भागातील लोकांमध्ये समन्वय घडवून आणणे हे एक आव्हान होते. यासंदर्भात डॉ. प्रसाद यांचे योगदान हे अविस्मरणीय आहे. वर्तमान आणि भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता, घटनेची विशिष्ट प्रकारे आखणी केली गेली. हे सर्व प्रसाद यांच्या सहभागामुळेच शक्य झाले आहे. भारतीय घटनेमध्ये जे काही महत्त्वपूर्ण निर्णय आणि हक्क समाविष्ट केले गेले, ते सर्व डॉ. प्रसाद यांच्या सहमतीने आणि सहभागाने झाले. दिवकर यांचे याबाबत ठाम मत आहे. १३ डिसेंबर १९४६ला राज्यघटना लिहिण्यास सुरुवात झाली होती आणि ती डिसेंबर १९४९ मध्ये ती पूर्ण झाली होती.