नवी दिल्ली - भारतात आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आत्तापर्यंत 3 कोटीवर पोहचलीय. आत्तापर्यंत 4 लाख रुग्णांनी आपले प्राण गमावलेत. तर दुसरीकडे दिलासादायक म्हणजे 2 कोटी रुग्णांवर यशस्वी उपचार झालेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. भारत सरकारकडून जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक कठोर पावलं उचलण्यात आली आहे. गेल्या 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिम देशभरात राबवण्यात येत आहे.
गेल्या 24 तासांमध्ये भारतात 44,111 रुग्ण आढळले आहेत. तर 57,477 जण कोरोना मुक्त झाले असून 738 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या वाढणाऱ्या राज्यात महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध प्रदेश, तामिळनाडूचा समावेश आहे.
देशातील कोरोना रुग्णांची स्थिती...
- एकूण रुग्ण : 3,05,02,362
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : 2,96,05,779
- सक्रिय रुग्ण संख्या: 4,95,533
- एकूण मृत्यू : 4,01,050
- एकूण लसीकरण : 34,46,11,291
आतापर्यंत 34 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण -
देशात कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा 1.31 टक्क्यावर आहे. तर कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट हा 97.06 वर पोहचला आहे. तसेच सक्रिय रुग्णांचा दर 1.62 वर गेला आहे. गेल्या 24 तासांत 43,99,298 जणांना लस टोचवण्यात आली आहे. तर आतापर्यंत 34,46,11,291 जणांचे लसीकरण झाले आहे.