नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांमध्ये २ लाख ४० हजार ८४२ नव्या कोरोना रुग्णांची; तसेच ३,७४१ बळींची नोंद करण्यात आली. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. पुन्हा एकदा एका दिवसातील बळींची संख्या चार हजारांहून खाली गेली आहे. तर, नव्या रुग्णांच्या संख्येतही सातत्याने घट दिसून येत आहे.
यानंतर देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ कोटी ६५ लाख, ३० हजार १३२ वर पोहोचली आहे. तर, एकूण बळींची संख्या २ लाख ९९ हजार २६६ वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत २ कोटी ३४ लाख २५ हजार ४६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत; तर सध्या २८ लाख ५ हजार ३९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, आतापर्यंत देशात एकूण १९ कोटी, ५० लाख, ४ हजार १८४ लोकांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यनिहाय कोरोना आकडेवारीसाठी येथे क्लिक करा..
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">