ETV Bharat / bharat

देशात गेल्या २४ तासांमध्ये १ लाख २७ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद; २,७९५ मृत्यू - कोरोना अपडेट भारत

गेल्या ४३ दिवसांमध्ये पहिल्यांदाच देशातील सक्रिय रुग्णांची संख्या २० लाखांहून खाली आली आहे. सध्या देशात १८ लाख, ९५ हजार ५२० सक्रिय रुग्ण आहेत. सध्या देशातील दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरही कमी होऊन ६.६२ टक्क्यांवर गेला आहे...

India COVD-19 tracker: State-wise report
देशात गेल्या २४ तासांमध्ये १ लाख २७ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद; २,७९५ मृत्यू
author img

By

Published : Jun 1, 2021, 3:40 PM IST

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांमध्ये १ लाख, २७ हजार ५१० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या ५१ दिवसांमधील ही एका दिवसातील सर्वात कमी आकडेवारी आहे. यानंतर देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ कोटी, ८१ लाख, ७५ हजार ४४ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.

गेल्या ४३ दिवसांमध्ये पहिल्यांदाच देशातील सक्रिय रुग्णांची संख्या २० लाखांहून खाली आली आहे. सध्या देशात १८ लाख, ९५ हजार ५२० सक्रिय रुग्ण आहेत. सध्या देशातील दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरही कमी होऊन ६.६२ टक्क्यांवर गेला आहे. गेल्या सात दिवसांपासून हा दर १० टक्क्यांहून राहिला आहे. तर, सध्या साप्ताहिक पॉिझिटिव्हिटी दरही ८.६४ टक्क्यांवर आला आहे.

तसेच, गेल्या २४ तासांमध्ये २ हजार ७९५ कोरोना मृत्यूंची नोंद करण्यात आली. यानंतर देशातील एकूण कोरोना बळींची संख्या ३ लाख, ३१ हजार ८९५वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांमध्ये २ लाख, ५५ हजार २८७ लोकांनी कोरोनावर मात केल्याचेही मंत्रालयाने सांगितले. सध्या देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ९२.०९ टक्क्यांवर असून, आतापर्यंत २ कोटी, ५९ लाख, ४७ हजार ६२९ लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यनिहाय कोरोना आकडेवारीसाठी येथे क्लिक करा..

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा : अभिनेता अक्षय कुमारचा रामदेव बाबांना पाठिंबा?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.