नवी दिल्ली - सीमा वाद सोडवण्यासाठी चुशूल येथे भारत आणि चीनमध्ये सैन्य बैठक पार पडली होती. पण, त्यात काही तोडगा निघाला नाही. मात्र, दोन्ही देशांनी सीमा प्रश्नी शांततापूर्ण तोडगा काढण्याबाबत सहमती दर्शवली आहे. अशी माहिती संरक्षण मत्रालयाने आज दिली.
दोन्ही देशांनी सैन्य आणि परराष्ट्र संबंधांच्या माध्यमातून वादग्रस्त विषयांवर एकमेकांशी चर्चा करण्याचे ठरवले आहे. तसेच, सीमेवर शांतता राखण्यासाठी इतर मुद्दे देखील सोडवण्याचे ठरले आहे, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.
दोन्ही देशांमध्ये पश्चिम क्षेत्रातील वास्तविक नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्याबाबत सखोल आणि स्पष्ट चर्चा झाली आहे. तसेच, दोन्ही देशांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या एकमताची अंमलबजावणी देखील केली जाईल, असे चर्चेत ठरले. यात सीमेवरील सैन्याने धीर ठेवणे व गैरसमज दूर करून शांतता नांदवण्याचा समावेश आहे. त्याचबरोबर, चीनने अजून एक बैठक घेण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती देखील संरक्षण मंत्रालयाने दिली.
हेही वाचा- 'कॉम्प्युटर बाबा'च्या अवैध बांधकामावर जेसीबी; इंदूर प्रशासनाची कारवाई