ETV Bharat / bharat

सीमावादावर भारत-चीन लष्करात १६ तास म‌ॅरेथॉन चर्चा - गलवान खोऱ्यात सीमावाद

शनिवारी सकाळी १० वाजता सुरू झालेली चर्चा दुसऱ्या दिवशी रात्री २ वाजता संपली, अशी माहिती सुत्रांनी दिली. गलवान खोऱ्यातील पँगॉग लेकच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यावरून सैन्य माघारी हटल्यानंतर दोनच दिवसांनी पुन्हा चर्चा सुरू करण्यात आली असून लवकरच तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भारत चीन सीमावाद
भारत चीन सीमावाद
author img

By

Published : Feb 21, 2021, 10:16 AM IST

नवी दिल्ली - भारत चीनमध्ये सीमावादावर काल (शनिवार) चर्चेची दहावी फेरी पार पडली. चिनी बाजूने असणाऱ्या सीमेवरील माल्डो या ठिकाणी कॉर्प्स कमांडर स्तरावर सुमारे १६ तास ही बैठक चालली. गलवान खोऱ्यातील सीमावाद मिटला असला तरी भारत-चीन सीमेवर अनेक ठिकाणांवरून मतभेद आहेत. यातील पूर्व लडाख, गोग्रा हाईट्स, डेपसांग प्लेन्स आणि हॉट स्प्रिंग हे भूभाग महत्त्वाचे असून येथील सीमावाद मिटवण्यावर प्रामुख्याने चर्चा झाली.

तोडगा निघण्याची अपेक्षा -

शनिवारी सकाळी १० वाजता सुरू झालेली चर्चा दुसऱ्या दिवशी रात्री २ वाजता संपली, अशी माहिती सुत्रांनी दिली. गलवान खोऱ्यातील पँगॉग लेकच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यावरून सैन्य माघारी हटल्यानंतर दोनच दिवसांनी पुन्हा चर्चा सुरू करण्यात आली असून लवकरच तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारत चीनमध्ये सीमावाद सुरू झाल्यानंतर आत्तापर्यंत लष्करी, राजनैतिक आणि विशेष प्रतिनिधी स्तरावर अनेक चर्चा झाली आहे.

भारताची एक इंचही जमीन कोणालाही बळकाऊ दिली जाणार नाही, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले असून त्यानुसारच चीनसोबत सीमावादावर चर्चा सुरू आहे. चर्चेदरम्यान भारताची रणनिती आणि दृष्टीकोन स्पष्ट असल्याचेही परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले. भारताच्या निर्धारामुळे तोडग्यापर्यंत पोहचल्याचेही ते म्हणाले.

भारताची एक इंचही जमीन देणार नाही - राजनाथ सिंह

मागील एक वर्षापासून भारत चीन सीमेवर तणाव सुरू होता. गलवान खोरे, पँगॉग सरोवर भागात दोन्ही देशाचे सैन्य आमनेसामने उभे होते. मात्र, आता सैन्य माघारी जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सीमेवर एप्रिल २०२० नंतर जे काही बांधकाम दोन्ही देशांनी केले असेल ते सर्व काढून टाकण्यात येईल आणि जैसे थे स्थिती आणली जाईल. पूर्वीप्रमाणे चीन त्यांचे सैन्य फिंगर ८ (गस्त पाँईन्ट) पर्यंत मागे घेईल तर भारतीय सैन्य फिंगर ३ जवळ थांबेल. जे काही मुद्दे सीमावादात राहीले आहेत, त्यांच्यावरही चर्चा सुरू आहे. लवकरच त्यावरही तोडगा काढला जाईल, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत बोलताना सांगितले होते.

दरम्यान, गतवर्षी गलवान खोऱ्यात सीमेनजिक भारतीय सैन्यासोबत झालेल्या धुमश्चक्रीत आपले पाच सैन्य अधिकारी आणि जवान मारले गेल्याची कबुली चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने दिली आहे. चीनने प्रथमच गलवान खोऱ्यातील तणावात आपले सैनिक ठार झाल्याची कबुली दिली आहे. गेल्यावर्षीच्या जूनमध्ये गलवान खोऱ्यात सीमेनजिक भारत आणि चीनी सैनिकांमध्ये धुमश्चक्री झाली होती. यात काराकोरममध्ये तैनात असलेले पाच अधिकारी आणि जवान ठार झाल्याचे चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगाने सांगितल्याचे वृत्त चिनी सैन्याच्या अधिकृत वृत्तपत्रात शुक्रवारी प्रकाशित झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.