ETV Bharat / bharat

India Brazil Sugar Dispute : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानवर ब्राझीलचा आक्षेप, वाद सोडवण्याकरिता भारताकडून चर्चा सुरू - जागतिक व्यापार संघटना

India Brazil Sugar Dispute : भारत आणि ब्राझीलने साखरेशी संबंधित व्यापारविषयक वाद सोडवण्यासाठी चर्चा सुरू केलीय. ब्राझील हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि निर्यात करणारा देश आहे. त्याचबरोबर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील चर्चेकडं संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे.

India Brazil Sugar Dispute
India Brazil Sugar Dispute
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2023, 7:27 PM IST

नवी दिल्ली India Brazil Sugar Dispute : भारत आणि ब्राझील यांनी साखरेशी संबंधित व्यापार वाद परस्पर सोडवण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेमध्ये (WTO) चर्चा सुरू केलीय. या वादाचं निराकरण करण्यासाठी भारतासोबत दक्षिण अमेरिकन देश इथेनॉल उत्पादन तंत्रज्ञान देऊ शकतात, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिलीय. ब्राझील हा जगातील सर्वात मोठा ऊस आणि इथेनॉल उत्पादक देश आहे. इथेनॉल उत्पादनासाठी वापरल्या जाणार्‍या तंत्रज्ञानातही ब्राझील आघाडीवर आहे. भारत-ब्राझीलमध्ये वाद सोडवण्यासाठी चर्चेच्या काही फेऱ्या झाल्या आहेत. त इथेनॉल उत्पादन तंत्रज्ञानाची भागीदारी करणार असल्याचे ब्राझीलने सांगितले, ही सकारात्मक बाब असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलंय.

भारत जगातील तिसरा मोठा कच्च्या तेलाचा ग्राहक : इथेनॉलचा वापर वाहनाच्या इंधनात मिसळण्यासाठी केला जातो. ऊसापासून काढलेले इथेनॉल तसेच तांदूळ आणि इतर कृषी उत्पादनांचा वापर केल्याने भारत जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा ग्राहक होणार आहे. यामुळं आयातदारांचे आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. भारत सध्या आपल्या गरजेच्या 85 टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. याशिवाय इथेनॉलमुळे कार्बन उत्सर्जनही कमी होते. भारताने 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य ठेवलंय. जिनिव्हा येथील बहुपक्षीय संस्थेतील वाद सोडवण्यासाठी, भारताला परस्पर सहमती समाधान (MAS) अंतर्गत आपल्या बाजूने काहीतरी ऑफर करावं लागेल. अलीकडेच भारत आणि अमेरिकेनं सहा व्यापारी वाद मिटवले असून सातवे प्रकरणही संपवण्यास सहमती दर्शवलीय. या उपायांतर्गत, भारतानं सफरचंद आणि अक्रोडासारख्या आठ अमेरिकन उत्पादनांवरील प्रतिशोधात्मक शुल्क हटवलंय. यामध्ये अमेरिकाही अतिरिक्त शुल्क न लादता भारतीय स्टील आणि ॲल्युमिनियम उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देत आहे.

भारत जगातील दुसरा मोठा साखर उत्पादक देश : सरकारी अधिकाऱ्यानं सांगितलं की, डब्ल्यूटीओमधील साखर वादातील इतर तक्रारींसाठी भारत हीच पद्धत अवलंबत आहे. 2019 साली ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि ग्वाटेमाला यांनी भारताला WTO वादात ओढले होते. त्यावेळी त्यांनी आरोप केला होता की, भारताने शेतकऱ्यांना दिलेले साखर अनुदान जागतिक व्यापार नियमांशी सुसंगत नाही. यावर WTO वाद निपटारा पॅनेलनं 14 डिसेंबर 2021 रोजी साखर क्षेत्रासाठी भारताचे उपाय जागतिक व्यापार नियमांशी सुसंगत नसल्याचा निर्णय दिला होता. यावर जानेवारी 2022 मध्ये, भारतानं या पॅनेलच्या निर्णयाविरुद्ध WTO च्या अपील मंडळाकडं अपील केलं होतं. अपीलीय संस्थेला वादांविरुद्ध निर्णय देण्याचा अंतिम अधिकार आहे. परंतु, अपीलीय मंडळाच्या सदस्यांच्या नियुक्त्यांवर देशांमधील मतभेदांमुळे ते कार्यरत नाही. ब्राझील हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि निर्यात करणारा देश आहे. तर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे.

डब्ल्यूटीओच्या सदस्यांनी केली तक्रार : डब्ल्यूटीओचे सदस्य ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि ग्वाटेमाला यांनी तक्रार केली होती की, ऊस उत्पादकांना भारताने दिलेले समर्थन उपाय ऊस उत्पादनाच्या एकूण मूल्याच्या 10 टक्क्यांच्या किमान पातळीपेक्षा जास्त आहेत. हे डब्ल्यूटीओच्या कृषी कराराशी सुसंगत नाही. याशिवाय भारताच्या कथित निर्यात अनुदानावरही या देशांनी चिंता व्यक्त केलीय. डब्ल्यूटीओच्या नियमांनुसार, जर कोणत्याही डब्ल्यूटीओ सदस्याला वाटले की कोणतेही व्यापार उपाय डब्ल्यूटीओच्या नियमांच्या विरोधात आहेत, तर ते जिनिव्हामधील बहुपक्षीय संस्थेमध्ये केस दाखल करू शकतात.

हेही वाचा :

  1. Maharashtra Cabinet Decisions Today: सहकारी साखर कारखान्यांना राज्य सरकार करणार मदत, जाणून घ्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय
  2. Sugar Factory Politics : साखरपट्ट्यात केसीआर यांची एन्ट्री; काँग्रेस, राष्ट्रवादीला धक्का देणार?
  3. Janshakti Sanghatana : ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक; पुण्यातल्या साखर संकुला बाहेर केलं भीक मागो आंदोलन....

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.