मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ विकेट्सने विजय मिळवला आहे. केएल राहुलच्या दमदार खेळीने भारताला विजय मिळवून दिली आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ 35.4 षटकात 188 धावांवर बाद झाला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीने 3-3 बळी घेतले. यानंतर भारतीय संघाने 39.5 षटकांत 5 गडी गमावून 191 धावा करत सामना जिंकला.
-
A hard-fought victory for India as they take a 1-0 series lead 👊#INDvAUS | 📝: https://t.co/V30MqMC4km pic.twitter.com/o0EwmiAAaV
— ICC (@ICC) March 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A hard-fought victory for India as they take a 1-0 series lead 👊#INDvAUS | 📝: https://t.co/V30MqMC4km pic.twitter.com/o0EwmiAAaV
— ICC (@ICC) March 17, 2023A hard-fought victory for India as they take a 1-0 series lead 👊#INDvAUS | 📝: https://t.co/V30MqMC4km pic.twitter.com/o0EwmiAAaV
— ICC (@ICC) March 17, 2023
केएल राहुलने 91 चेंडूत 75 धावा : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाने दिलेले 189 धावांचे आव्हान 39.5 षटकात 5 गडी राखून पूर्ण केले. सामना भारताच्या हातातून निसटत असल्याचे दिसत असताना केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी भागीदारी करून भारताला विजयापर्यंत नेले. या सामन्यात केएल राहुलने 91 चेंडूत 75 धावा केल्या. रवींद्र जडेजाने 69 चेंडूत 45 धावा केल्या.
108 धावांची नाबाद भागीदारी : भारतीय संघाने 39 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. पण भारताचा सलामीवीर केएल राहुलने 91 चेंडूत 75 धावांची नाबाद खेळी खेळून विजय मिळवला. त्याला रवींद्र जडेजाने साथ दिली. जडेजाने 69 चेंडूत 45 धावांची शानदार नाबाद खेळी खेळली. राहुल आणि जडेजाने सहाव्या विकेटसाठी 123 चेंडूत 108 धावांची नाबाद भागीदारी केली. याआधी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पराभूत केले होते. आता वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात दणदणीत पराभव पत्करावा लागला.
5 विकेट्सने विजय मिळवला : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विजयाने सुरुवात केली आहे. पहिला सामना मुंबईत खेळला गेला, ज्यात भारतीय संघाने 5 विकेट्सने विजय मिळवला. सामन्याचा नायक केएल राहुल होता, ज्याने कठीण परिस्थितीत आपले तेरावे अर्धशतक झळकावले आणि संघाला विजयापर्यंत नेले.