हैदराबाद : आज संपूर्ण भारत ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत. भारताला स्वतंत्र पाहण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व शूर स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. 200 वर्षांच्या इंग्रजांच्या अत्याचारानंतर भारताला इंग्रजांच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळाले. पण, स्वातंत्र्याचा लढा खूप खडतर होता.
स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांच्या हृदयात देशभक्तीची भावना : देशातील महापुरुषांनी दिलेल्या घोषणांनी लोकांनी संघटित करण्याचे काम केले. हे ऐकून स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांच्या हृदयात देशभक्तीची भावना आणखीनच वाढली. वर्षानुवर्षे, स्वातंत्र्यसैनिकांनी काही संस्मरणीय घोषणा दिल्या आहेत.
स्वातंत्र्यसैनिकांच्या काही संस्मरणीय घोषणा
1. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा (सुभाषचंद्र बोस) : सुभाषचंद्र बोस हे स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी कोणतेही साहस करण्याची तयारी असलेल्या सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय सैन्यदलाचाी स्थापना केली. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असा नारा देत त्यांनी तरुणांना प्राणाची आहुती देण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन केले.
2. इन्कलाब जिंदाबाद (शहीद भगतसिंग) : हे एक नाव आहे जे प्रत्येक मुलाला माहित आहे. स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांनी वयाच्या २३ व्या वर्षी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांनी मौलाना हसरत मोहनीब, उर्दू कवी आणि स्वातंत्र्यसैनिक यांना उद्देशून लिहिलेली इन्कलाब झिंदाबाद ही घोषणा लोकप्रिय झाली.
3. करो किंवा मरो (महात्मा गांधी) : 'करो किंवा मरो' ही घोषणा ब्रिटीशांना देश सोडण्याची दिलेली शेवटची हाक होती. ही हाक महात्मा गांधींनी 1942 साली मुंबईतील भाषणात दिली होती. यातून भारत छोडो आंदोलनाची सुरुवात झाली.
४. सत्यमेव जयते (पंडित मदन मोहन मालवीय) : पंडित मदन मोहन मालवीय यांनी 1918 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस परिषदेत अध्यक्षीय भाषण देताना जनतेला प्रेरणा देण्यासाठी हा नारा दिला होता. सत्यमेव जयते म्हणजे 'सत्याचाच विजय', असे पंडित मदन मोहन मालवीय यांनी म्हटले.
5. सरफरोशीकी तमन्ना….(रामप्रसाद बिस्मिल) : रामप्रसाद बिस्मिल यांच्या देशभक्तीपर कवितेतील सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजुए कातिल में है,, या ओळींनी इंग्रजाविरोधातील लढ्यात चेतना निर्माण झाली. कवितेने लोकांना त्यांचे मौल्यवान स्वातंत्र्य मिळविण्यासाठी महान त्याग करण्याची प्रेरणा दिली.
हेही वाचा :