ETV Bharat / bharat

Droupadi Murmu : चांद्रयान ते G20, जाणून घ्या द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणातील 5 महत्वाचे मुद्दे - President address to nation

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी देशाला संबोधित केले. 'भारताने जागतिक स्तरावर आपले स्थान परत मिळवले आहे, असे त्यांनी आपल्या अभिभाषणात सांगितले. तसेच 'G20 चे अध्यक्षपद ही भारतासाठी एक अनोखी संधी आहे', असेही त्या म्हणाल्या. (Independence day 2023)

Droupadi Murmu
द्रौपदी मुर्मू
author img

By

Published : Aug 14, 2023, 9:20 PM IST

नवी दिल्ली : ७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला संबोधित केले. यावेळी बोलताना, भारत ही लोकशाहीची जननी आहे, असे त्या म्हणाल्या. (Independence day 2023)

आपल्या सर्वांची एक ओळख आहे : 'जात, पंथ, भाषा, प्रदेश याशिवाय आपली एक ओळख आपल्या कुटुंबाशी आणि आपल्या कार्यक्षेत्राशी निगडित आहे. पण आपली आणखी एक ओळख आहे जी या सगळ्यांच्या वर आहे आणि ती म्हणजे आपण भारताचे नागरिक आहोत. आपल्या सर्वांना समान संधी आणि अधिकार आहेत, तसेच आपली कर्तव्ये देखील समान आहेत', असे द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

आदिवासींना आधुनिकता स्वीकारण्याचे आवाहन : 'देशाने आव्हानांचे रूपांतर संधींमध्ये केले. तसेच जीडीपीमध्ये देखील वाढ नोंदवली. आमच्या अन्नदाता शेतकऱ्यांनी आमच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. राष्ट्र त्यांचे ऋणी आहे', असे राष्ट्रपती म्हणाल्या. 'आदिवासींची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांना प्रगतीच्या प्रवासात सामावून घेण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. मी माझ्या आदिवासी बंधू-भगिनींना आवाहन करते की, तुम्ही सर्वांनी आपल्या परंपरा समृद्ध करताना आधुनिकतेचा अंगीकार करा, असे मुर्मू म्हणाल्या.

इस्रोचे कौतूक केले : 'इस्रो दररोज नवी उंची गाठत आहे. इस्रोने प्रक्षेपित केलेल्या चांद्रयान 3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. चंद्रावरची ही मोहीम आपल्या अंतराळातील भविष्यातील कार्यक्रमांसाठी फक्त एक पायरी आहे. आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे', असे राष्ट्रपती आपल्या अभिभाषणात म्हणाल्या. 'संशोधन, नवीन तंत्रज्ञान आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी सरकार पुढील पाच वर्षांत 50,000 कोटी रुपयांच्या निधीतून अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना करत आहे. हे फाउंडेशन महाविद्यालये, विद्यापीठे आणि संशोधन केंद्रांमध्ये संशोधन आणि विकासाला समर्थन देईल', असे राष्ट्रपतींनी सांगितले.

महिला प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे : 'आज महिला देशाच्या विकास आणि सेवेच्या प्रत्येक क्षेत्रात भरीव योगदान देत आहेत. आज आपल्या महिलांनी अशा अनेक क्षेत्रात विशेष स्थान निर्माण केले आहे ज्यात त्यांच्या सहभागाची काही दशकांपूर्वी कल्पनाही केली जात नव्हती. सरोजिनी नायडू, अम्मू स्वामीनाथन, रमा देवी, अरुणा असफ अली, सुचेता कृपलानी यांसारख्या अनेक महिलांनी त्यांच्या नंतरच्या पिढ्यांसाठी देश आणि समाजाची सेवा करण्यासाठी प्रेरणादायी आदर्श मांडले, असे द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

G20 चे अध्यक्षपद एक संधी : 'भारत संपूर्ण जगात विकासाची उद्दिष्टे आणि मानवतावादी सहकार्याला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारताने आंतरराष्ट्रीय मंचांवर आघाडीचे स्थान बनवले आहे. तसेच भारताने G20 देशांच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही स्वीकारली आहे. G20 जगाच्या लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करत असल्याने, आपल्यासाठी ही एक अनोखी संधी आहे', असे राष्ट्रपती आपल्या अभिभाषणात म्हणाल्या.

  • LIVE: President Droupadi Murmu's address to the nation on the eve of the 77th Independence Day https://t.co/zSk7DOt38a

    — President of India (@rashtrapatibhvn) August 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा :

  1. Independence Day 2023 : १८०० विशेष पाहुणे, १२ सेल्फी पॉइंट्स; यंदाचा स्वातंत्र्यदिन कार्यक्रम का आहे खास?
  2. President Police Medal : महाराष्ट्रातील 'या' 3 अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
  3. Independence Day 2023 : पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वज फडकावतात ती दोरी कुठून येते? जाणून घ्या...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.