मुंबई : 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होती. त्यानिमित्त देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठई देशभरात जय्यत तयारी करण्यात येत आहे. 75 वर्षांच्या निमित्त आझादी का अमृत महोत्सव (Amrit Mahotsav of Azadi) या टॅगलाईन खाली वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आज आपण 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील पाच ऐतिहासिक स्मारकांच्याबाबत जाणून घेणार ( Independence Day 2022 ) आहोत.
लाल किल्ला - दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रत्येक वर्षी पंतप्रधान तिरंगा फडकवून देशातील जनतेला संबोधित करतात. मुघल सम्राट बहादूर शाह जफरने 1857 च्या बंडात सहभाग घेतला होता. मात्र, या बंडामध्ये भारतीय क्रांतिकारकांचा पराभव झाला होता. त्यानंतर सम्राट जफरला रंगूनला पाठवले गेले. पण, ज्या ज्या वेळी लाल किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो भारताच्या स्वातंत्र्याशी जोडला गेला आहे.
इंडिया गेट - अँग्लो-अफगाण युद्धामध्ये विरमरण आलेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इंडिया गेट बांधण्यात आलं. हे युद्ध स्मारक म्हणून ओळखलं जातं. त्याचसोबत, 1971 साली भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झालं होते. तेव्हाच्या झालेल्या युद्धात विरमरण आलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ 1972 साली इंडिया गेटवर अमर जवान ज्योती बांधली गेली. 1972 ते 2022 ही ज्योती धगधगत होती. पण, भारत-पाकिस्तान युद्धाला 50 वर्षे झाल्याच्या पार्श्वभूमीवर अमर जवान ज्योतीचे राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलगीकरण करण्यात आलं.
सेल्युलर जेल - या जेलला काळ्या पाणीच्या नावाने ओळखलं जाते. देशात ज्यावेळी स्वातंत्र्याची मागणी करण्यात येत होती, तेव्हा ब्रिटीशांनी सेल्युलर जेलला वसाहत तुरुंग बनवलं होते. ज्या क्रांतिकारकांपासून इंग्रजांना जास्त धोका वाटत होता, त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून या तुरुंगात ठेवण्यात आले. बटुकेश्वर दत्त, योगेश्वर शुक्ल, विनायक दामोदर सावरकर या स्वातंत्र्यसैनिकांना या कारागृहात ठेवण्यात आले होते. आता त्याचे संग्रहालय आणि स्मारकात रूपांतर झाले आहे.
झाशीमधील राणी किल्ला - उत्तर प्रदेशमधील झाशीत असलेला राणीचा किल्ला बंगीरा नावाच्या टेकडीवर बांधण्यात आला आहे. इंग्रजांना देशातून हाकलून लावण्यासाठी मोठी भूमिका बजावणाऱ्या शूरवीर राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाचा हा किल्ला साक्षीदार आहे. त्यांच्या पुढाकारानेच स्वातंत्र्याची लढाई खऱ्या अर्थाने सुरु झाली. हा लढा पुढे क्रांतीत रुपांतरीत झाला. त्यामुळे अनेक क्रांतिकारकांनी इंग्रजांना येथून पळून जाण्यास भाग पाडले.
हेही वाचा - Indian Independence Day 75 वर्षांत साक्षरता आणि अन्य विभागात भारताची प्रगती किती? वाचा