फ्लोरिडा: भारत आणि वेस्ट इंडिज संघात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पाचवा आणि अंतिम टी-20 सामना ( IND vs WI 5th T20 ), रविवारी लॉडरहिल येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने श्रेयस अय्यर (64) आणि दीपक हुडा (38) आणि फिरकीपटूंच्या दमदार कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिजचा 88 धावांनी पराभव ( India won by 88 runs ) केला.
-
T20I Series In The Bag 👏 🏆
— BCCI (@BCCI) August 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Smiles All Around 😊 😊#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/GsDf1x8J6I
">T20I Series In The Bag 👏 🏆
— BCCI (@BCCI) August 7, 2022
Smiles All Around 😊 😊#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/GsDf1x8J6IT20I Series In The Bag 👏 🏆
— BCCI (@BCCI) August 7, 2022
Smiles All Around 😊 😊#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/GsDf1x8J6I
त्याचबरोबर पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 अशा फरकाने आपल्या नावे केली. प्रथम फलंदाजी करताना भारताने सात गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्यानंतर विंडीजचा डाव 15.4 षटकांत 100 धावांत आटोपला. त्यामुळे भारतीय संघाने मोठा विजय नोंदवला.
भारतीय फिरकीपटूंची शानदार कामगिरी -
-
For his superb bowling display of 3⃣/1⃣5⃣, @akshar2026 bags the Player of the Match award as #TeamIndia beat West Indies in the fifth #WIvIND T20I to complete a 4-1 series win. 👏 👏
— BCCI (@BCCI) August 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard 👉 https://t.co/EgKXTtbLEa pic.twitter.com/ihN8RyQT4S
">For his superb bowling display of 3⃣/1⃣5⃣, @akshar2026 bags the Player of the Match award as #TeamIndia beat West Indies in the fifth #WIvIND T20I to complete a 4-1 series win. 👏 👏
— BCCI (@BCCI) August 7, 2022
Scorecard 👉 https://t.co/EgKXTtbLEa pic.twitter.com/ihN8RyQT4SFor his superb bowling display of 3⃣/1⃣5⃣, @akshar2026 bags the Player of the Match award as #TeamIndia beat West Indies in the fifth #WIvIND T20I to complete a 4-1 series win. 👏 👏
— BCCI (@BCCI) August 7, 2022
Scorecard 👉 https://t.co/EgKXTtbLEa pic.twitter.com/ihN8RyQT4S
भारतीय फिरकीपटूंनी 9.2 षटकांत 43 धावांत सर्व 10 बळी घेतले. यामध्ये रवी विश्नोईने 2.4 षटकात 16 धावांत 4 बळी घेतले, तर डावखुऱ्या अक्षर पटेल ( Left-hander Akshar Patel ) आणि कुलदीप यादवने प्रत्येकी तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजसाठी फक्त शिमरॉन हेटमायर (35 चेंडूत 56) हाच योगदान देऊ शकला. नियमित कर्णधार रोहितच्या जागी संघाची धुरा सांभाळणाऱ्या हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
श्रेयसचे दमदार अर्धशतक -
-
Innings Break!
— BCCI (@BCCI) August 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A solid batting display from #TeamIndia to post 188/7 on the board. 👌 👌
Over to our bowlers now. 👍
Scorecard 👉 https://t.co/EgKXTtbLEa #WIvIND pic.twitter.com/Xo2InbzUEh
">Innings Break!
— BCCI (@BCCI) August 7, 2022
A solid batting display from #TeamIndia to post 188/7 on the board. 👌 👌
Over to our bowlers now. 👍
Scorecard 👉 https://t.co/EgKXTtbLEa #WIvIND pic.twitter.com/Xo2InbzUEhInnings Break!
— BCCI (@BCCI) August 7, 2022
A solid batting display from #TeamIndia to post 188/7 on the board. 👌 👌
Over to our bowlers now. 👍
Scorecard 👉 https://t.co/EgKXTtbLEa #WIvIND pic.twitter.com/Xo2InbzUEh
श्रेयसने 40 चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकारांसह सलामीवीर इशान किशन ( Opener Ishan Kishan ) (13 चेंडूत 11 धावा), पहिल्या विकेटसाठी 38 आणि हुडाच्या दुसऱ्या विकेटसाठी 76 धावा ठोकल्या. हुडाने 25 चेंडूंच्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. शेवटच्या षटकात धावबाद होण्यापूर्वी कर्णधार हार्दिकने 16 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 28 धावा केल्या.
ओडिन स्मिथची भेदक गोलंदाजी -
वेस्ट इंडिजकडून ओडिन स्मिथने ( Fast bowler Odean Smith ) चार षटकांत 33 धावा देत तीन बळी घेतले. या सामन्यात पुन्हा एकदा नव्या जोडीने भारतीय संघासाठी डावाची सुरुवात केली. अय्यरने किफायतशीर फटके केली, परंतु इशान संघातील संधीचे सोने करण्यात अपयशी ठरला. जेव्हा अय्यरआणि हुड्डा फलंदाजी करत होते तेव्हा संघ 200 हून अधिक धावांच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत होते.
सामन्याच्या 14व्या षटकात विजेचा कडकडाट झाल्याने सामना 15 मिनिटे थांबवावा लागला. यावेळी भारतीय संघ तीन गड्यांच्या मोबदल्यात 135 धावा अशा चांगल्या स्थितीत होता पण अखेरच्या षटकांमध्ये संघाला अपेक्षेप्रमाणे वेगवान धावा करता आल्या नाहीत. संजू सॅमसन ( Batsman Sanju Samson ) (15 धावा) पुन्हा एकदा अपयशी ठरला, तर दिनेश कार्तिक (12 धावा) सलग दुसऱ्या सामन्यात फिनिशरची भूमिका बजावू शकला नाही.
-
5⃣ Matches
— BCCI (@BCCI) August 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
7⃣ Wickets@arshdeepsinghh impressed with the ball in the 5⃣-match T20I series & won the Player of the Series award. 👌 👌 #TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/XI4xzKQW1F
">5⃣ Matches
— BCCI (@BCCI) August 7, 2022
7⃣ Wickets@arshdeepsinghh impressed with the ball in the 5⃣-match T20I series & won the Player of the Series award. 👌 👌 #TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/XI4xzKQW1F5⃣ Matches
— BCCI (@BCCI) August 7, 2022
7⃣ Wickets@arshdeepsinghh impressed with the ball in the 5⃣-match T20I series & won the Player of the Series award. 👌 👌 #TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/XI4xzKQW1F
श्रेयसने ( Batsman Shreyas Iyer ) डावाच्या सुरुवातीलाही आक्रमक खेळ केला. त्याने सलग दोन चौकार मारून डॉमिनिक ड्रेक्सविरुद्ध हात उघडले. इशान पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर हुडाने कीमो पॉलच्या चेंडूवर यष्टिरक्षकावरुन चौकार मारला. आठव्या षटकात श्रेयसने स्मिथविरुद्ध सलग दोन षटकार मारून धावगती जलद केली, तर हुडाने हेडन वॉल्शविरुद्ध किफायतशीर षटकार ठोकला.
त्याने ओबेद मॅकॉयच्या डोक्यावरुन आणखी एक शानदार षटकार ठोकला. याआधीच मालिका जिंकलेल्या भारतीय संघाने कर्णधार रोहित, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार आणि सूर्यकुमार यादव या चार अनुभवी खेळाडूंच्या जागी इशान, कुलदीप, पंड्या आणि श्रेयसचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला होता.
हेही वाचा - Kamal-Sreeja Akula clinch Gold : शरथ कमल-श्रीजा अकुला यांना टेबल टेनिस मिश्र दुहेरीचे सुवर्णपदक