पर्थ: T20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 5 गड्यांनी पराभव केला आहे. आफ्रिकेला विजयासाठी 134 धावांची गरज होती. आफ्रिकेने हे लक्ष 19.4 षटकांत 5 गडी गमावून पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने 46 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या. तर भारताकडून अर्शदीप सिंहने 25 धावा देवून 2 विकेट्स घेतल्या.
T20 विश्वचषकात (T20 World Cup) भारताचा तिसरा सामना दक्षिण आफ्रिकेसोबत आहे. विश्वचषकाच्या तिसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. (IND vs SA). भारताने 20 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 133 धावा बनवल्या. भारताकडून सुर्यकुमार यादवने सर्वाधिक 68 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून एलगिडीने घातक गोलंदाजी करत 4 षटकांत 29 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताची प्रथम फलंदाजी करताना खराब सुरुवात झाली आहे. भारताने 10 ओवर मध्ये 5 विकेट गमावल्या आहेत.
भारताकडून कर्णधार रोहीत शर्मा आणि के एल राहूल सलामीला आले. पारीच्या 5 व्या षटकात रोहीत शर्मा 14 चेंडूत 15 धावा काढून बाद झाला. त्याला लुंगी एगिडीने स्वत:च्या गोलंदाजीत झेल घेत बाद केले. तर के एल राहूल देखील केवळ 9 धावा काढून बाद झाला. त्याला देखील लुंगी एगिडीने बाद केले.
तीसऱ्या क्रमांकावार फलंदाजीला आलेला विराट कोहली देखील काही कमाल दाखवू शकला नाही. तो 11 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 12 धावा काढून लुंगी एगिडीच्या गोलंदाजीत बाद झाला. दीपक हुड्डा शून्य धावांवर नॉर्कीयाच्या हातून झेलबाद झाला. तर अष्टपैलू हार्दिक पंड्या देखील केवळ 2 धावा काढून बाद झाला. त्याची विकेट लुंगी एनगिडीनेच घेतली.
एनगीडीने 3 षटकांत 17 धावा देत 4 विकेट घेतल्या आहेत.
सध्या सुर्यकुमार यादव आणि दिनेश कार्तिक फलंदाजी करत आहेत.
भारतीय संघात एक बदल: कर्णधार रोहित शर्माने संघात एक बदल केला आहे. अष्टपैलू अक्षर पटेलच्या जागी दीपक हुडाला संघात स्थान देण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिका संघातही एक बदल करण्यात आला आहे. फिरकीपटू तबरेझ शम्सीच्या जागी वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीचा संघात समावेश करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियातील पर्थच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघ जिंकून गुणतालिकेत सर्वोच्च स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही संघांमध्ये खेळण्यात आलेल्या टी-20 सामन्यांचा विक्रम पाहिल्यास, भारताचा अफ्रिकेवर नेहमीच वरचष्मा राहिला आहे.
दोन्ही संघांची प्लेईंग 11
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेंबा बावुमा (कर्णधार), रिले रुसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे.