राजकोट : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना ( India vs South Africa 4th T20 ) शुक्रवारी (17 जून) खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी सातला सुरुवात होणार आहे. हा सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशन स्टेडियमवर पार पडणार आहे. तत्पुर्वी भारताचा कर्णधार ऋषभ पंत आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा ( Captain Temba Babuma ) यांच्यात नाणेफेक पार पडली. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय ( South Africa opt to bowl ) घेतला आहे.
-
🚨 Toss Update 🚨
— BCCI (@BCCI) June 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
South Africa have elected to bowl against #TeamIndia.
Follow the match ▶️ https://t.co/9Mx4DQmACq #INDvSA | @Paytm pic.twitter.com/2gR3HYGQiG
">🚨 Toss Update 🚨
— BCCI (@BCCI) June 17, 2022
South Africa have elected to bowl against #TeamIndia.
Follow the match ▶️ https://t.co/9Mx4DQmACq #INDvSA | @Paytm pic.twitter.com/2gR3HYGQiG🚨 Toss Update 🚨
— BCCI (@BCCI) June 17, 2022
South Africa have elected to bowl against #TeamIndia.
Follow the match ▶️ https://t.co/9Mx4DQmACq #INDvSA | @Paytm pic.twitter.com/2gR3HYGQiG
दोन्ही संघात या आधी तीन सामने पार पडले आहेत. त्यापैकी पहिल्या दोन सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने भारताला मात दिली आहे. त्याचबरोबर मालिकेतील तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत विजयापासून दूर ठेवले आहे. आजचा सामना जर दक्षिण आफ्रिका संघाने जिंकला, तर त्यांच्या नावी मालिका होईल. त्याचबरोबर भारताने सामना जिंकला तर मालिकेत बरोबरी होईल. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्याचा निकाल पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक आहे. त्याचबरोबर भारताला कर्णधार ऋषभ पंत ( Captain Rishabh Pant ) फार्ममध्ये परतण्याची अपेक्षा असणार आहे.
-
🚨 A look at #TeamIndia's and South Africa's Playing XIs 🔽
— BCCI (@BCCI) June 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Follow the match ▶️ https://t.co/9Mx4DQmACq #INDvSA | @Paytm pic.twitter.com/0tYfy2SWjA
">🚨 A look at #TeamIndia's and South Africa's Playing XIs 🔽
— BCCI (@BCCI) June 17, 2022
Follow the match ▶️ https://t.co/9Mx4DQmACq #INDvSA | @Paytm pic.twitter.com/0tYfy2SWjA🚨 A look at #TeamIndia's and South Africa's Playing XIs 🔽
— BCCI (@BCCI) June 17, 2022
Follow the match ▶️ https://t.co/9Mx4DQmACq #INDvSA | @Paytm pic.twitter.com/0tYfy2SWjA
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, मार्को जॅनसेन, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी आणि एनरिक नॉर्टजे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रुतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल आणि आवेश खान.