ETV Bharat / bharat

IND vs AUS 3rd T20 : भारत-ऑस्ट्रेलिया संघात आज निर्णायक सामना, रोहितला सलग नववी मालिका जिंकण्याची संधी - Virat Kohli

हैदराबादमध्ये रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील ( IND vs AUS T20 Series ) अंतिम आणि निर्णायक सामन्यात आमनेसामने असतील. कर्णधार म्हणून रोहित शर्माला ( Captain Rohit Sharma ) सलग नववी मालिका जिंकण्याची संधी असेल तर ऑस्ट्रेलिया घरच्या मैदानावर भारताला दुसऱ्यांदा पराभूत करणारा पहिला संघ होण्याच्या मार्गावर आहे.

IND vs AUS
IND vs AUS
author img

By

Published : Sep 25, 2022, 12:26 PM IST

हैदराबाद: नागपूरच्या ओल्या मैदानामुळे भारताने आठ षटकांचा सामना जिंकून या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील ( IND vs AUS T20 Series ) आपले आव्हान जीवंत ठेवले आहे. त्यामुळे आता मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामन्यात रविवारी हैदराबाद येथे दोन्ही संघ आमनेसामने येतील. कर्णधार म्हणून रोहित शर्माला सलग नववी मालिका जिंकण्याची संधी असेल तर ऑस्ट्रेलिया घरच्या मैदानावर भारताला दुसऱ्यांदा पराभूत करणारा पहिला संघ होण्याच्या मार्गावर आहे. दोन्ही संघांना देखील सामना जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांसाठी आजचा सामना करो या मरो'चा असणार आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तीन सामन्यांच्या मालिकेतील अंतिम आणि तिसरा सामना आज खेळला ( IND vs AUS 3rd T20 ) जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी सातला राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम ( Rajiv Gandhi International Cricket Stadium Hyderabad ) हैदराबाद येथे सुरुवात होईल. दोन्ही संघांना काहीतरी करुन दाखवण्याची चांगली संधी आहे. कारण त्यासाठी हैदराबादचे हवामान चांगले असणार आहे. या करो या मरोच्या सामन्याशी संबंधित महत्त्वाच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया.

अक्षर मुख्य फिरकीपटू बनण्याच्या मार्गावर निघाला -

रवींद्र जडेजाच्या दुखापतीनंतर इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यात आलेला डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने ( Spinner Axar Patel ) आपली योग्यता सिद्ध केली आहे. तो हळूहळू भारतीय टी-20 आंतरराष्ट्रीय संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज बनत आहे. त्याने या मालिकेत किफायतशीर गोलंदाजी केली आहे, प्रामुख्याने पॉवरप्लेमध्ये विकेट्स घेतल्या आहेत. त्याची खासियत म्हणजे तो एका डावात कधीही गोलंदाजी करू शकतो आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची इकॉनॉमी केवळ 7.1 आहे.

त्याच्या राउंड द विकेट अँगलने तो उजव्या हाताच्या फलंदाजांना खूप त्रास देतो. उजव्या हाताच्या फलंदाजांविरुद्ध त्याच्या भारतीय कारकिर्दीत अक्षरने 6.2 च्या इकॉनॉमीने 21 विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियन संघात मॅथ्यू वेडशिवाय ( Matthew Wade ) दुसरा डावखुरा फलंदाज नाही आणि अशा परिस्थितीत अक्षरकडे विकेट्स वाढवण्याची चांगली संधी आहे. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करताना अक्षरने या मालिकेत पाच पैकी चार त्रिफळाचित करत बळी घेतले आहेत.

बिग शो झाला फ्लॉप शो -

टी-20 क्रिकेटचा सुपरस्टार ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell ) जगभरातील लीगमध्ये त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तथापि, 2020 पासून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याची कामगिरी खाली आली आहे. मागील दोन वर्षामध्ये बॅटने त्याची सरासरी 20 च्या खाली होती, या वर्षी तो 21.8 च्या सरासरीने धावा करत आहे. इतकेच नाही तर त्याचा स्ट्राइक रेट 129 आहे जो 2013 नंतर कोणत्याही एका वर्षातील त्याचा सर्वात कमी स्ट्राइक रेट आहे.

2020 सालापासून, मॅक्सवेलने 27 डावांमध्ये फलंदाजी केली आहे आणि 20 धावांचा टप्पा केवळ आठ वेळा ओलांडला आहे. चिंतेची बाब म्हणजे 14 वेळा त्याला दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही. फिरकी गोलंदाज म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या मॅक्सवेलने फिरकीविरुद्ध संघर्ष केला असून गेल्या तीन वर्षांत तो 13 वेळा फिरकीविरुद्ध बाद झाला आहे. असेच सुरू राहिल्यास ऑस्ट्रेलियाला टी-20 विश्वचषकाचा बचाव करणे कठीण होईल.

निर्णायक सामन्यात कोहली ठरु शकतो किंग -

या मालिकेतील दोन सामन्यांमध्ये कमी धावा केल्या असल्या तरी विराट कोहलीसाठी ( Virat Kohli ) हे वर्ष चांगले गेले. या वर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कोहलीने तीन अर्धशतके आणि एका शतकाच्या मदतीने 141 च्या स्ट्राइक रेटने 370 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 डावांमध्ये सर्वाधिक 731 धावा करणाऱ्या कोहलीला मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात धावा करायला आवडतात. एवढेच नाही तर, गेल्या तीन निर्णायक सामन्यांमध्ये त्याने नाबाद अर्धशतक झळकावले असून त्याला हैदराबादमध्ये ही मालिका सुरू ठेवायला आवडेल.

दोन्ही संघ:

भारतीय संघ: केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव दीपक चहर आणि दीपक हुडा.

ऑस्ट्रेलिया संघ: अॅरॉन फिंच (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, टीम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), स्टीव्हन स्मिथ, डॅनियल सॅम्स, शॉन अॅबॉट, पॅट कमिन्स, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड, केन रिचर्डसन, अॅश्टन अगर, जोश इंग्लिस आणि नॅथन एलिसो.

हेही वाचा - Mahendra Singh Dhoni: महेंद्र सिंह धोनी आज मोठी घोषणा करण्याची शक्यता, दुपारी २ वाजता येणार लाईव्ह.. म्हणाला..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.