ETV Bharat / bharat

Kerala Youtubers : भन्नाड यूट्यूबर्सवर धडक कारवाई, करबुडव्यांकडून 25 कोटींची रक्कम वसूल करणार - केरळच्या युट्युबर्सची कर चोरी

प्राप्तिकर विभागाने केरळमधील 13 प्रमुख युट्युबर्सच्या घरांवर छापे टाकले. यूट्यूबर्स त्यांच्या कमाईनुसार आयकर भरत नसल्याची माहिती मिळाल्यानंतर हे छापे टाकण्यात आले होते.

Income Tax
कर चोरी
author img

By

Published : Jun 23, 2023, 7:52 PM IST

कोची (केरळ) : गुरुवारी आयकर विभागाने केरळमध्ये लाखो सबस्क्राइबर्स असलेल्या लोकप्रिय युट्युबर्सच्या घरांवर आणि निवासस्थानांवर छापे टाकले. या छाप्यांमध्ये 13 लोकप्रिय मल्याळी यूट्यूबर्सने तब्बल 25 कोटी रुपयांची करचोरी केल्याचे आढळून आले आहे. यापैकी बहुतेकांवर दोन कोटी रुपयांहून अधिक आयकराची थकबाकी आहे. अभिनेत्री आणि प्रेझेंटर परली मानी, सेबिन आणि साजू मोहम्मद यांचाही या 13 युट्युबर्सच्या यादीत समावेश आहे. तपास पथकाने 1 कोटी ते 2 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या यूट्यूबर्सच्या घरांची तपासणी केली.

युट्युबर्स कमाईनुसार आयकर भरत नसल्याचे निदर्शनास : या छाप्यांच्या माध्यमातून कर भरत नसलेल्या लोकांची संख्या अधिक असल्याचेही समोर आले आहे. युट्युबर्स त्यांच्या कमाईनुसार आयकर भरत नसल्याची माहिती मिळाल्यानंतर हे छापे टाकण्यात आले होते. यावेळी युट्युबर्सच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची प्रामुख्याने तपासणी करण्यात आली. पुढील प्रक्रिया म्हणून त्यांना नोटीस देऊन पुढील कारवाई केली जाईल. कायद्यानुसार त्यांना भरावा लागणारा आयकर दंड भरून ते पुढील कायदेशीर कार्यवाही टाळू शकतात. विशेष म्हणजे, केरळमधील अनेक नामवंत यूट्यूबर्सची कमाई करोडोंमध्ये आहे.

या आधीही टाकले होते छापे : यापूर्वी, आयकर विभागाने केरळमधील प्रसिद्ध चित्रपट कलाकारांच्या घरांवर छापे टाकले होते. अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध अभिनेते मोहनलाल यांचे जबाब नोंदवले होते. आयकर अधिकाऱ्यांनी अँथनी पेरुम्बवूर, अँटो जोसेफ, लिस्टिन स्टीफन तसेच अभिनेता आणि निर्माता पृथ्वीराज या मल्याळम चित्रपट निर्मात्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवरही छापे टाकले होते. 2011 मध्येही प्राप्तिकर विभागाने मोहनलाल आणि मामूट्टी यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली होती.

हे ही वाचा :

  1. Senthil Balaji : ईडीची धाड पडल्यानंतर 'हे' मंत्री ढसाढसा रडले..जाणून घ्या कोण आहेत सेंथिल बालाजी
  2. TN Govt On CBI : सीबीआयला तामीळनाडूत येण्याचे रस्ते बंद, तपासासाठी घ्यावी लागेल द्रमुक सरकारची परवानगी
  3. COVID 19 Jumbo Centers Scam: 100 कोटींची संपत्ती ईडीच्या रडारवर...आयएएस संजीव जयस्वाल यांनी ईडीकडे मागितला चार दिवसांचा वेळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.