ETV Bharat / bharat

पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये 79.79 टक्के तर आसाममध्ये 72.14 टक्के मतदानाची नोंद - Assam Election Update

पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडले, पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी 79.79 टक्के मतदान झाले, तर आसाममध्ये पहिल्या टप्प्यासाठी 72.14 टक्के मतदानाची नोंद झाली. दरम्यान पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये 30 जागांसाठी तर आसाममधील 47 जागांसाठी आज मतदान झाले.

पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये 79.79 टक्के तर आसाममध्ये 72.14 टक्के मतदानाची नोंद

author img

By

Published : Mar 27, 2021, 8:58 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडले, पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी 79.79 टक्के मतदान झाले, तर आसाममध्ये पहिल्या टप्प्यासाठी 72.14 टक्के मतदानाची नोंद झाली. दरम्यान पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये 30 जागांसाठी तर आसाममधील 47 जागांसाठी आज मतदान झाले.

पश्चिम बंगालमध्ये भाजपने लढवल्या 29 जागा

बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल समोर भाजपाने कडवे आव्हाण निर्माण केले आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीचा सामना आहे. यामध्ये आता कोण बाजी मारणार हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. बंगालमधील 30 जागांपैकी 29 जागा भाजपाने लढवल्या आहेत. त्यापैकी एक जागा ही अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेला (एजेएसयू) सोडण्यात आली. दरम्यान दुसरीकडे तृणमूलनेही 30 जागांपैकी 29 च जागा लढवल्या असून, एका जागेसाठी त्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कॉंग्रेसने केवळ पाच जागाच लढवल्या असून, उर्वरीत जागांवर डाव्या पक्षांकडून उमेदवार उभे करण्यात आले होते. सीपीएमने 18 जागा तर सीपीआयने 4 जागा लढवल्या आहेत.

आसाममध्ये पुन्हा भाजपची सत्ता येणार - सोनोवाल

आसाममध्ये भाजपा पहिल्या टप्प्यातील 47 पैकी 39 जागा लढवत आहे. तर उर्वरीत 10 जागांवर आसाम गण परिषदेने आपले उमेदवार उभे केले आहेत. दोन जागांवर मैत्रीपूर्ण लढत आहे. आसाममध्ये काँग्रेसने एआययूडीएफ, बोडोलँड पीपल्स फ्रंट, सीपीआय, सीपीआय (एम), सीपीआय (एमएल), राजद आणि अंचलिक गण मोर्चा या पक्षांसोबत युती केली असून, निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी 43 जागा लढवल्या आहेत. दरम्यान पुन्हा एकदा आसाममध्ये भाजपची सत्ता येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस आणि इतर पक्ष नाही, तर भाजपा वास्तवीक परिस्थिती जाणून आहे. सीएए आणि एनआरसीने कुणाचेही नुकसान होणार नाही, हे आसाममधील लोकांना माहिती आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा भाजपची सत्ता कायम राहणार असल्याची प्रतिक्रिया सर्बानंद सोनोवाल यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.