ETV Bharat / bharat

Father Raped His Daughter In UP : धक्कादायक! पित्यानेच केला आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार - father raped his minor daughter

बाप-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये एका पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. (Father Raped His Daughter In UP) पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By

Published : Apr 17, 2022, 11:11 AM IST

सहारनपुर - बाप-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये एका पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. (Father Raped Daughter In Uttar Pradesh) पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. यासह त्याच्यावर पॉस्को कायद्यासह अनेक गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले.

पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला - सदर बाजार कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक म्हणाले की, आठवडाभरापूर्वी आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून बाप फरार झाला होता. एवढेच नाही तर मुलीला कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती. ९ एप्रिल रोजी पीडितेने सदर बझार पोलीस ठाण्यात वडिलांवर कारवाई करण्याची मागणी करणारा लेखी अर्ज दिला होता. यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला.

कडक कारवाई - फरार आरोपी गांधी पार्कजवळ कुठेतरी जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. यानंतर उपनिरीक्षक विजय सिंह, कॉन्स्टेबल राजन आणि योगेश कुमार यांच्यासह घटनास्थळी पोहोचले. समोर पोलिसांना पाहून आरोपी पळून गेला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

कारागृहात रवानगी - एसपी सिटी राजेश कुमार यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा (2012)अंतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्परतेने कारवाई करत पोलिसांनी आरोपीला शनिवारी सायंकाळी उशिरा गांधी पार्क तिराहा येथून अटक करून त्याच्यावर आवश्यक कारवाई करून त्याची कारागृहात रवानगी केली.

हेही वाचा - Husband forced for rape : पतीने शेतमालकाला पत्नीवर करायला लावला सामुहिक बलात्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.