ETV Bharat / bharat

Beware Of Finding Love on Social Media : ओडिशात फेसबुक फ्रेंडने फसवून केले लग्न; लग्नानंतर डाव उघड

author img

By

Published : May 28, 2022, 10:43 AM IST

सोशल मीडियावर आपले प्रेम शोधणाऱ्या लोकांसाठी ही बातमी एक इशारा आहे. हे शक्य आहे की तुम्ही फेसबुकवर ज्या व्यक्तीला मुलगी म्हणून पसंत करीत आहात आणि तो प्रत्यक्षात मुलगा आहे. अशीच एक घटना ओडिशातील भद्रकमध्ये समोर आली आहे, जिथे लग्नानंतर मुलाला कळले की त्याची वधू मेघना मुलगी नसून तो मुलगा मेघनाद आहे.

The boy, not the bride
नववधु नसून तो नववर

भद्रक : ओडिशातील भद्रक जिल्ह्यात ( Bhadrak district of Odisha ) एका तरुणाला फेसबुक फ्रेंडशी लग्न करणं महागात ( Expensive to marry a Facebook friend ) पडलं. खरं तर, तरुणाने जिच्यावर मेघना म्हणून प्रेम केलं आणि झटपट लग्नही लावलं, ती मुलगी रिसेप्शनच्या वेळीच मुलगा निघाली. बनावट वधूचे मूळ नाव मेघनाद आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी त्या तरुणाचे केस कापले. हे प्रकरण सध्या पोलिसांकडे आहे.

अशी घडली घटना : ही गोष्ट ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील बासुदेवपूर पोलिस हद्दीतील कासिया भागातील आहे. पण ही गोष्ट फेसबुकपासून सुरू होते. पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील आलोक कुमार मिस्त्री यांची फेसबुकवर ओडिशाच्या केंद्रपारा जिल्ह्यातील मेघना मंडल या मुलीशी मैत्री झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैत्रीनंतर दोघांमध्ये बोलणी सुरू झाली. यादरम्यान मेघनाने आलोकला सांगितले की, ती केंद्रपारा येथील रामनगर गावची असून तिच्या वडिलांचे नाव विश्वनाथ मंडल आहे. रामनगर हे गाव केंद्रपारा जिल्ह्यातील जंबू सागरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येते. पंधरा दिवसांत जेव्हा संवाद वाढला तेव्हा दोघांनीही एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त केले. प्रेमाची उधळण इतकी वाढली की दोघांनी लगेच लग्न करण्याचा निर्णय घेतला.

पहिल्या भेटीतच लग्न : 24 मे रोजी आलोक मेघनाला भेटण्यासाठी जाजपूर जिल्ह्यातील चंडीखोल येथे आला होता. भेटीनंतर आलोक त्याची मैत्रीण मेघनाला घेऊन त्याच्या मामाच्या घरी कासिया, बासुदेवपूर येथे गेला. मेघनाचे त्याच्या मामाच्या कुटुंबीयांनी भव्य स्वागत केले आणि दोघांनीही येथे लग्न केले. संध्याकाळी कुटुंबाने रिसेप्शन पार्टीही ठेवली होती. रिसेप्शन पार्टी सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच, स्टेजवर बसलेली मुलगी प्रत्यक्षात मुलगा असल्याचे कळल्यावर आलोक आणि त्याच्या मामाला धक्का बसला. प्रत्यक्षात त्या पार्टीत सामील असलेल्या एका व्यक्तीने वधूचे नाव मेघना नसून मेघनाद असल्याचे उघड केले. मेघनादच्या दूरच्या काकानेच कौल उघडला. यानंतर गावातील काही लोकांनी मेघनाथची चौकशीही केली.

मेघनादला दिला चोप : मेघना बनलेल्या मेघनादनेच या मुलाला आणि त्याच्या कुटुंबियांना फसवल्याची पुष्टी झाल्यावर गावकरी संतप्त झाले. त्यांनी मेघनादला मारहाण करून त्याचे केस कापले. दरम्यान, माहिती मिळताच पोलीसही पोहोचले आणि त्यांनी मेघनादची गावकऱ्यांपासून सुटका केली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मेघनादला त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हेही वाचा : Social Media Fraud Case : सोशल मीडियावरील मैत्रिणीने तरुणाला घातला 14 लाखांचा गंडा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.