ETV Bharat / bharat

प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला पाऊल टाकतायेत -स्वाती मालीवाल

दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे 'WICCI' अंतर्गत भारत-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड बिझनेस कौन्सिलद्वारे आयोजित दोन दिवसीय 'महिला इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री' या कार्यक्रमात पुरस्कार वितरण सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी सहभाग नोंदवला आहे.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांचा महिला इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री' या कार्यक्रमात सहभाग

author img

By

Published : Jun 12, 2022, 7:12 PM IST

नवी दिल्ली - 'महिला इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री' अंतर्गत भारत-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड बिझनेस कौन्सिलद्वारे आयोजीत दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे या कार्यक्रमाचे आयोज करण्यात आले आहे. यामध्ये पुरस्कार वितरण समारंभाचेही आयोजन करण्यात आले असून आपापल्या क्षेत्रातील जबाबदारीबद्दल महिलांचा गौरव गौरव करण्यात आला.

व्हिडीओ

या कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहाल्या. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. महिला करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले.

प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिलाही पाऊल टाकत आहेत. आपला व्यवसाय त्या पुढे घेऊन जात आहेत. फॅशन डिझाईनच्या क्षेत्रात महिलांनी बरीच प्रगती केली आहे. याशिवाय देशाच्या अर्थव्यवस्थेतही महिलांचा मोठा वाटा आहे.

या कार्यक्रमात देशातील विविध राज्यातील महिलांनी सहभाग घेऊन आपापल्या क्षेत्रात केलेल्या कार्याची मोजणी केली. हाऊस ऑफ क्रीफिनच्या संचालक आणि सीईओ समृद्धी यांनी सांगितले की, मेटाव्हर्स डिजिटल सूचनांच्या नवीन स्वरूपासाठी संधी देते.

फॅशनपासून ऑटोमोबाईल्सपर्यंत कला आणि संस्कृतीपर्यंत, प्रत्येक उद्योगावर परिणाम होईल. आमचा विश्वास आहे की मेटाव्हर्स हा खेळ नसून एक जागा आहे. जिथे पुढील दशकात लाखो लोक सामील होतील. या उद्योगाला ते नक्की पुढे घऊन जातील.

हेही वाचा - Sonia Gandhi In Hospital: सोनीया गांधी यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.