ETV Bharat / bharat

Top News Today: एका क्लिकवर वाचा, आजच्या महत्त्वाच्या बातम्या - PM Modi Gujrat Visit

राहा जगाशी अप टू डेट. वाचा देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्या येथे (Important Top News). थोडक्यात आजच्या ठळक घडामोडींचा आढावा घेवू या.

Top News Today
महत्त्वाच्या बातम्या
author img

By

Published : Oct 20, 2022, 7:47 AM IST

मुंबई: वाचा देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्या येथे (Important Top News) वाचा.

महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

आज परतीचा पाऊस परतण्याची शक्यता (Rain Update Today) : सध्या परतीचा पाऊस वेगाने माघारी सरकत असून २० ऑक्टोबरपर्यंत मान्सून राज्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीत ढगाळ वातावरण राहू शकते. मात्र, पावसाची शक्यता खूपच कमी आहे, असे हवामानतज्ज्ञांनी सांगितले.

रत्नागिरीत धरणे आंदोलन (Agitation in Ratnagiri) : 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वाधिक फटका हा कोकणातील मराठी शाळांना बसणार असून दुर्गम भागात, वाडी वस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येऊ शकते. शासनाचे या निर्णयामुळे होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधण्यासाठी गाव विकास समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आज सकाळी 10 ते दुपारी 2 वा. या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे हे धरणे आंदोलन होणार असल्याची माहिती गाव विकास समितीचे सरचिटणीस सुरेंद्र काब्दुले यांनी दिली आहे.

आज अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर युक्तीवाद ( Anil Deshmukh bail application Hearing today) : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज युक्तिवाद होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय कोर्टात 20 ऑक्टोबर रोजी सीबीआय युक्तिवाद करणार आहे. ईडीच्या प्रकरणात जामीन मिळाल्यानतंर सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यातही जामीन मिळावा अशी विनंती अनिल देशमुखांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरात दौरा ( PM Modi Gujrat Visit) : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या यांचा गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यांच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. त्यांच्या हस्ते आज सकाळी 9:45 च्या सुमाराला केवडिया लाईफ अभियानाचा शुभारंभ होणार आहे. दुपारी 12 च्या सुमाराला पंतप्रधान केवडिया येथे 10व्या मिशन प्रमुखांच्या परिषदेत सहभागी होतील. त्यानंतर, दुपारी 3:45 च्या सुमाराला ते व्यारा येथील विविध विकास उपक्रमांची पायाभरणी करणार आहेत.

आज सत्येंद्र जैन यांच्या जामीन अर्जावर सुनावणी (Hearing on bail application of Satyendra Jain) : आर्थिक गैरव्यावहार प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या जामीन अर्जावर सुनावणी आहे. सत्येंद्र जैन यांच्या जामीनाला ईडीनं विरोध केला असून त्यावर आज सुनावणी आहे.

कोल्हापुरात शिवसैनिकांचा मोर्चा (Shiv Sainik march in Kolhapur) : कर्नाटक सरकारने कोल्हापुरातील कनेरीवाडी या ठिकाणी कर्नाटक भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याला कोल्हापुरातील शिवसैनिकांनी विरोध केला आहे. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात कर्नाटक भवन होऊ देणार नाही ,अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. उद्या याच संदर्भात कनेरी मठावर हजारो शिवसैनिक मोर्चा नेणार आहेत.

आज एमसीए अध्यक्षपदाची निवडणूक (Mumbai Cricket Association Election) : आज मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. शरद पवार आणि शेलार पॅनलचे अमोल काळे विरुद्ध माजी कसोटीवीर संदिप पाटील अशी थेट लढत आहे.

मनसुख मांडविया यांचा अहमदनगर दौरा (Ahmednagar Visit of Mansukh Mandaviya) : आज केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया हे अहमदनगर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते डॉ. विखे पाटील कॅन्सर सेंटरचे लोकार्पण होणार आहे. सकाळी 11 वाजता, डॉ विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल विळद घाट, अहमदनगर येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.