ऋतुजा लटकेंचा राजीनामा आज 11 वाजेपर्यंत स्वीकारणार (Rituja Latke resignation) -ऋतुजा लटकेंचा राजीनामा उद्या 11 वाजेपर्यंत स्वीकारा, असे कोर्टाचे मुंबई महापालिकेला आदेश दिले आहेत. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील उमेदवारीचा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर आहे.
अनिल देशमुखांच्या याचिकेवर आज सुनावणी (today Hearing on Anil Deshmukh petition) - ईडीकडून अनिल देशमुखांना दिलासा मिळाल्यानंतर अनिल देशमुखांनी सीबीआय कोर्टात जामीनासाठी अर्ज केला आहे.त्यावर आज सुनावणी होणार आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस -अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ( Andheri East By-Election) शिवसेना ठाकरे गट आणि भाजपचा उमेदवार ठरले आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके तर भाजपकडून मुरजी पटेल यांच्यात लढत होणार आहे. उद्धव गट आणि भाजपसाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. उद्धव गटाकडून ऋतुजा लटके आणि भाजपकडून आज मुरजी पटेल उमेदवारी अर्ज दाखल करतील. या वेळी दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.
Monsoon 2022 : उद्यापासून (15 ऑक्टोबर) परतीचा मान्सून माघारी फिरणार, पाऊस उघडण्याची शक्यता - ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी 15 ऑक्टोबरपासून राज्यात पाऊस उघडीपीची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले. उद्यापर्यंत राज्यात परतीचा पाऊस असण्याची शक्यता आहे.
आज राज्यात 'या' ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट ( Rain Yellow Alert )- परतीच्या पावसानं राज्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. दरम्यान, मुंबईसह ठाणे परिसरात देखील पावसानं चांगलीच हजेरी लावली. त्याचबरोबर बीड, कोल्हापूर, धुळे, पालघर, लातूर, सोलापूर, सांगली, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. आजही हवामान विभागानं राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. उद्यापर्यंत राज्यात परतीचा पाऊस असण्याची शक्यता आहे.