ETV Bharat / bharat

देश-विदेशातील आज होणाऱ्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर.. - अखिल भारतीय किसान सभा

अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चा अखेर मुंबईत पोहोचला आहे. या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. आज, 25 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. या मोर्चात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

important events
important events
author img

By

Published : Jan 25, 2021, 4:01 AM IST

अखिल भारतीय किसान सभेचा महामार्चा राजभवनावर धडकणार -

important events
अखिल भारतीय किसान महासभा

अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चा अखेर मुंबईत पोहोचला आहे. या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. आज, 25 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. रा राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 2 महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान मोर्चानं हे आंदोलन पुकारलं आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात नाशिकहुन मुंबईला हा मोर्चा पोहोचला आहे.

शेतकरी मोर्चात सामील होणार शरद पवार -

important events
शरद पवार
अखिल भारतीय किसान सभेच्या विराट मोर्चानं मुंबईकडे कूच केली आहे. या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. २५ जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. या मोर्चाद्वारे केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकरी मोर्चाच सामील होणार -

thackeray
मुख्यमंत्री

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास दोन महिन्यापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास आता महाराष्ट्रतील शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर आज अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात नाशिक येथून निघालेले हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आझाद मैदान येथे मोर्चात सहभागी होऊ शकतात.

राहुल गांधींच्या तीन दिवसीय तामिळनाडू दौऱ्याचा शेवटचा दिवस -

important events
राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका येत्या एप्रिल-मे मध्ये जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीसाठी राहुल गांधी २३ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान तीन दिवसीय तामिलनाडू दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्याचा आज शेवटचा दिवस असून ते दिवसभरात अनेक कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.

सांगलीत स्वाभिमानीचा ट्रॅक्टर मोर्चा -

important events
राजू शेट्टी

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास दोन महिन्यापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास आता महाराष्ट्रतील शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. सांगलीत माजी खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे.

सांगलीत आजपासून नवीन हळद सौद्यांना सुरुवात -

important events
संग्रहित छायाचित्र

सांगलीच्या वसंतदादा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारपासून नवीन हळदीच्या सौद्यांना प्रारंभ होत आहे. प्रतिवर्षी डिसेंबर महिन्यांपासून हळद काढणीला सुरुवात होते. जानेवारीच्या पंधरावड्यात बाजार समितीमध्ये नवीन हळद सौद्यांना सुरुवात केली जाते. सांगलीची हळद पेठ संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. आंध्र प्रदेश, बेळगाव, विजापूरसह शेजारच्या सीमाभागातील हळद सांगली बाजार समितीकडे विक्रीसाठी येते.

राज्यात आजपासून सलग पाच दिवस पुन्हा कोरोना लसीकरण -

important events
कोरोना लसीकरण

राज्यात आपासून सलग पाच दिवस पुन्हा कोरोना लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणासाठी अधिकचे साडे आठ लाख डोस राज्याला उपलब्ध झाले आहेत. यामुळे सलीकरणाची प्रक्रिया वेगवान होऊ शकणार आहे.

हिमाचल प्रदेश ५० वा स्थापना दिवस, जे पी नड्डा राहणार उपस्थित -

important events
जे.पी. नड्डा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हिमाचल प्रदेशच्या स्थापणा दिवस कार्यक्रमाला संबोधित करतील. २५ जानेवारी १९७१ मध्ये हिमाचलप्रदेशला संपूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता. हिमाचल प्रदेशचा आज ५० वा स्थापना दिवस आहे.

मोदींचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्यांशी संवाद -

important events
नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 12 वाजता प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कर विजेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. 2021 या वर्षाच्या पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातल्या 32 मुलांची निवड केली आहे. यावेळी महिला आणि बालविकास मंत्रीही उपस्थित असणार आहेत.

राष्ट्रीय मतदार दिवस -

important events
मतदार दिवस

राष्ट्रीय मतदार दिवस भारतात २०११ पासून साजरा केला जातो. 25 जनवरी 1950 ला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापणा झाली होती. यानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. अकराव्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून भारतीय निवडणूक आयोगाचे २५ जानेवारी २०२१ रोजी ई मतदार ओळखपत्र (e-EPIC) तयार करून प्राप्त करता येणार आहे. ई-मतदार ओळखपत्र म्हणजे ई - ईपीक एक सुरक्षित पोर्टेबल कागदपत्र स्वरूप (पीडीएफ) आवृत्ती आहे. जी मोबाइलवर किंवा संगणकावर स्व-मुद्रण योग्य स्वरूपात डाउनलोड केली जाऊ शकते. मतदार अशा प्रकारे कार्ड मोबाइलवर ठेवू शकतो. ते डीजी लॉकरवर पीडीएफ म्हणून अपलोड करू शकतो किंवा मुद्रित करू शकतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.