मुंबईत लसीचा तुटवडा, 52 लसीकरण केंद्र बंद
मुंबईत शुक्रवारी लसीचा साठा कमी असल्याने 52 लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली होती. आज शनिवारी ज्यांचा दुसरा डोस आहे. अशा लोकांनाच शिल्लक लसीच्या साठ्यामधून लस द्यावी, असे आदेश पालिकेट्या आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत.
ऑक्सिजन एक्स्प्रेस नागपुरातून आज नाशिक रोड स्थानकात
नागपूर स्टेशनात ऑक्सिजन एक्स्प्रेस मधील ३ टँकर उतरविण्यात येणार असून उर्वरित टँकर नाशिक रोड स्थानकात उतरविण्यात येणार आहेत. ऑक्सिजन एक्स्प्रेस आज सकाळी नाशिक रोड स्टेशनवर पोहोचणार आहे, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
केरळमध्ये आज आणि उद्या कडक निर्बंध!
केरळमध्ये आज आणि उद्या कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात आली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी ही घोषणा केली आहे.
कर्नाटकात आज आणि उद्या विकेंड कर्फ्यू
कर्नाटकामध्ये बुधवारपासून 4 मेपर्यंत पर्यंत सोमवार ते शुक्रवार या कालावधीत नाईट कर्फ्यू लागू केला आहे. तर आज आणि उद्या विकेंड कर्फ्यू असणार आहे. विकेंड कर्फ्यूमध्ये सकाळी 6 ते 10 या चार तासांच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू मिळू शकतील.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा आज वाढदिवस
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा 48 वा वाढदिवस आहे. क्रिकेटजगातील देव अशी ओळख असलेल्या सचिनवर आज जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
वरुण धवणचा आज 34 वा वाढदिवस
बॉलिवूड अभिनेता वरुण धवणचा आज वाढदिवस आहे. वरुणने आपल्या कलाकारीने बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. वरुण धवनने 'स्टुडंट ऑफ द ईयर' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
आयपीएलमध्ये आज राजस्थानविरोधात कोलकाताचा सामना
आयपीएलमध्ये आज राजस्थानविरोधात कोलकाताचा सामना रंगणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सायंकाळी 7 वाजून 30 सामन्याला सुरुवात होणार आहे.