- दिल्ली शेतकरी आंदोलनाचा 122 वा दिवस
दिल्ली - शेतकरी आंदोलन सुरू होऊन 100 दिवसा पेक्षा जास्त कालावधी झाला आहे. हे आंदोलक अजून सुद्धा दिल्लीच्या सिमेवर आपल्या मागण्यासाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आजचा 122 दिवसा आहे.
- संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
दिल्ली - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात अनेक महत्वाच्या मद्द्यावर चर्चा केली जात आहे.
- राज्यात आज आठ वाजल्यापासून जमावबंदी
मुंबई - राज्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने लॉकडाऊन संदर्भात नव्याने गाइडलाइन जारी केल्या आहेत. त्यानुसार येत्या 15 एप्रिलपर्यंत पुन्हा काही निर्बंध कडक करण्यात आले आहेत. आज रात्री 8 वाजल्यापासून ते पहाटे 7 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
- आज होणार सैन्य भरती परीक्षा
दिल्ली - आज देशभरात सैन्य भरती परीक्षा होणार आहे. 28 फेब्रुवारीला होणारी परीक्षा रद्द केली गेली होती.
- स्पाईस जेटची 66 मार्गावर वीमान सेवा होनार सुरू
मुंबई - स्पाईस जेट कंपनी आज पासून नवीन 66 मार्गावर विमान सेवा सुरू करणार आहे. कोरोनामुळे या सेवा बंद्द करण्यात आल्या होत्या.
- आज देशभरात साजरी होणार होळी
मुंबई - राज्यासह देशभरात आज होळी साजरी केली जाणार आहे. होळी सणावर राज्य सरकारणे करोनामुळे निर्बंध टाकले आहेत.