ETV Bharat / bharat

राज्यासह देशभरातील आजच्या महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर - आजच्या महत्वाच्या घडामोडी

मुंबईत १८ व ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण, कोल्हापुरातील गोकुळ दूध संघ निवडणूक निकालासह राज्यासह देशभरातील आज होणाऱ्या महत्वाच्या घडामोडी

important-events
यूपीमध्ये लॉकडाऊन वाढवला
author img

By

Published : May 4, 2021, 4:26 AM IST

Updated : May 4, 2021, 5:34 AM IST

गोकुळ दूध संघाचे सत्ताधारी आज ठरणार.. चुरस शिगेला

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ संघासाठी कोरोना काळातही तब्बल 99.78 टक्के इतके मतदान झाले. अनेक ठिकाणी शक्तिप्रदर्शन करत दोन्ही गटांनी मतदानाआधीच आपापली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत सत्ताधारी महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील यांच्या विरोधात पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी तगडे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही गटांतील या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदार नेमका कोणाला कौल देतात याची संपूर्ण जिल्ह्यासह राज्याला उत्सुकता लागून राहिली आहे.

important-events
गोकुळचा आज निकाल

जे. पी. नड्डा बंगाल दौऱ्यावर -

पश्चिम बंगाल निवडणुकीचे निकाल जाहीर होताच बंगालमध्ये हिंसक घटना घडल्या आहेत. या घटनांचा भाजपने निषेध केला असून भाजप त्याविरोधात देशभरात निर्देशने करणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आजपासून दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर जाणार आहेत. ते कोलकाता परिसरातील हिंसक घटना घडलेल्या स्थानांची पाहणी करतील.

important-events
जे. पी. नड्डा

आज आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन -

प्रत्येक वर्षी चार मे राजी जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस साजरा केला जातो. 1999 पासून प्रत्येक वर्षी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसांची सुरूवात २ डिसेंवर १९९८ मध्ये ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या आगीत पाच अग्निशमन जवानांच्या झालेल्या मृत्यूनंतर करण्यात आली.

important-events
अग्निशमन दिवस

मुंबईत १८ व ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण आजपासून -

मुंबई - मुंबईत कोरोना लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लसीचा तुटवडा जाणवत आहे. लसीच्या तुटवड्यामुळे ४५ वर्षावरील लसीकरण गेले चार दिवस बंद होते. ते लसीकरण आज मंगळवार पासून सुरू होत आहे. त्याचप्रमाणे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण केले जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे

important-events
मुंबईत आजपासून १८ वर्षांपुढच्या नागरिकांचे लसीकरण

संजय राऊत आज अदर पुनावाला प्रकरणात बोलणार -

महाराष्ट्र सरकारने सोमवारी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया लिमिटेड चे सीईओ अदर पूनावाला यांना सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे. पुनावाला यांनी आपल्याला धमक्या येत असल्याचा आरोप केला होता. यावरून राजकीय वातावरण पेटले असून त्यावर शिवसेना नेते संजय राऊत आज टिप्पणी करू शकतात.

important-events
संजय राऊत

महाराष्ट्र सरकार आज कोरोना लसीसाठी ग्लोबल टेंडर काढण्याची शक्यता -

राज्यात कोरोनाचं प्रमाण वाढत चालल्याची चिंता एकीकडे असताना दुसरीकडे कोरोना लस, रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालाय. लसीकरण, रेमडेसिवीर इंजेक्शन्ससाठी महाराष्ट्र सरकार ग्लोबल टेंडर काढणार आहे. त्यासाठी पाच जणांची कमिटी नेमणार आहोत. यांची घोषणा आज होऊ शकते.

important-events
राज्य सरकार आज ग्लोबल टेंडर काढणार

यूपीमध्ये लॉकडाऊन वाढवला, बिहारमध्ये आज होणार निर्णय -

कोरोना संक्रमणाचा वेग कमी करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये लॉकडाऊन दोन दिवसांनी वाढवला आहे. 4 मे राजी सकाळी लॉकडाऊन संपणार होता. मात्र आता हा लॉकडाऊन 6 मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत वाढवला आहे. या दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. मेडिकल शॉप, भाजी, दूध, किराना दुकाने सुरू राहतील. या दरम्यान अत्यावश्यक सेवांसाठी ई-पास जारी केले जातील. दुसरीकडे बिहारमध्येही लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता आहे. आज साडे अकरा वाजता क्रायसिस मॅनेजमेंटची बैठक बोलावण्यात आली आहे. बिहारमध्ये 15 मे पर्यंत लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

important-events
यूपीमध्ये लॉकडाऊन वाढवला,

आयपीएलमध्ये आज मुंबईची गाठ हैदराबादशी -

आयपीएलच्या ३१ व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्स व सनरायझर्स हैदराबाद संघात सामना होणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली मेदानावर हा सामना खळवला जाणार आहे.

important-events
आयपीएल

Last Updated : May 4, 2021, 5:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.