नवी दिल्ली : उद्या 1 जानेवारीला संपूर्ण देश नवीन वर्ष साजरा करणार आहे. वर्ष बदलत असताना देशात अनेक मोठे आणि महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. या बदलांचा तुमच्यावर थेट परिणाम होईल, त्यामुळं जानेवारी 2024 च्या पहिल्या दिवशी कोणते नियम लागू होतील, 'हे' जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
UPI आयडी निष्क्रिय असेल : UPI पेमेंट करणार्या वापरकर्त्यांसाठी जानेवारी 2024 खूप महत्वाचं आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) नं PAYTM, Google Pay, Phone Pay सारख्या ऑनलाइन पेमेंट ॲप्सचे UPI ID बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. NPCI नं 7 नोव्हेंबरच्या परिपत्रकात पेमेंट ॲप्स तंसच UPI आयडी नंबर निष्क्रिय करण्यास बँकांना सांगितलं आहे. सर्व बँका, थर्ड पार्टी ॲप्सना 31 डिसेंबरपर्यंत या नियमांचं पालन करावं लागणार आहे.
बँक लॉकर करार : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) नं बँक लॉकर करारामध्ये सुधारणा केली आहे. याअंतर्गत ग्राहकांना निर्णय घेण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून ही मुदत 1 जानेवारीला संपणार आहे. आरबीआयनं सर्व बँकांना त्यांच्या ग्राहकांचे लॉकर करार सुधारित करण्यास सांगितलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, सुरक्षित ठेव लॉकरच्या नवीन नियमांनुसार, ग्राहकांना त्यांच्या बँकांशी नवीन करार करणं आवश्यक असेल.
बिलेटेड ITR दाखल करण्याची अंतिम मुदत : आर्थिक वर्ष 2022-23 साठी दंड शुल्कासह प्राप्तिकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख देखील 31 डिसेंबर 2023 म्हणजेच आज आहे. आयकर कायद्याच्या कलम 234F अंतर्गत, दिलेल्या मुदतीपूर्वी रिटर्न भरण्यात अयशस्वी झालेल्या व्यक्तींना दंड भरावा लागू शकतो. मुदत चुकवणाऱ्यांसाठी 5 हजार रुपये दंड आहे. ज्यांचं एकूण उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना फक्त 1 हजार रुपये कमी दंड भरावा लागेल.
केवायसी प्रक्रिया समाप्त होईल : मोबाईल फोन वापरकर्ते 2024 च्या पहिल्या दिवशी पेपर फॉर्म न भरता नवीन सिम कार्ड मिळवू शकतील. दूरसंचार विभाग 1 जानेवारी 2024 पासून सिम कार्डसाठी कागदावर आधारित KYC प्रक्रिया समाप्त करणार आहे. दूरसंचार विभाग (DoT) च्या अधिसूचनेनुसार, पेपर-आधारित (KYC) प्रक्रिया 1 जानेवारीपासून टप्प्याटप्प्यानं बंद केली जाईल. याचा अर्थ आता नवीन सिम कार्ड घेण्यासाठी ग्राहकांना फक्त डिजिटल केवायसी म्हणजेच ई-केवायसी करावं लागणार आहे.
वाहनांच्या किमतीत वाढ : मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, ऑडी इंडियासह भारतातील अनेक वाहन उत्पादकांनी जानेवारी 2024 मध्ये त्यांच्या प्रवासी वाहनांच्या किमती वाढवण्याची योजना जाहीर केली आहे.
हेही वाचा -